Home /News /maharashtra /

Omicron Variant ची भीती, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

Omicron Variant ची भीती, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

Omicron Variant: या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची (cabinet meeting) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा (Corona Virus) नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant)मुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची (cabinet meeting) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशीही चर्चा करणार आहेत. याव्यतिरिक्त देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज बैठकीत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा कोविडच्या धोकादायक नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच, राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. हेही वाचा- 'तू सोबत असतेस तेव्हा..' विराटनं अनुष्काबरोबरचा शेअर केला खास Photo, पत्नीनं दिलं मजेशीर उत्तर कोविडच्या धोकादायक नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला दिले आहे. तसंच, मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. पण, आता लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या