मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /shivsena dasara melava : सावरकर वादावरून उद्धव ठाकरेंचा राजनाथ सिंहांवर घणाघात

shivsena dasara melava : सावरकर वादावरून उद्धव ठाकरेंचा राजनाथ सिंहांवर घणाघात

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता.

मुंबई, 15 ऑक्टोबर : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांना काही दिवसांपूर्वी विनायक सावरकर (vinayak damodar savarkar) यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता. पण, सावरकर आणि महात्मा गांधी यांची नाव घेण्याची तरी आपली लायकी आहे का? असा विखारी सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहे.(uddhav thackeray dasara speech 2021)

शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांच्या वादावरून थेट राजनाथ सिंह यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

'राजनाथ सिंह हे मध्यंतरी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बोलले. मुळात सावरकर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का? असा सवालच उद्धव ठाकरेंनी विचारला.

तसंच, 'महिलांवर अत्याचार वाढत आहे. मी दसऱ्या मेळाव्यात बोललो होते, 'माय मरो आणि गाय जगो' हे हिंदुत्त्व नाही. यावर वाद झाला. मग हिंदुत्व म्हणजे काय आहे, कुणाकडून हिंदुत्व शिकायचं? आणि कुणाला शिकवायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही, आजच जर हे सत्य आहे, तेव्हा हिंदूत्वाला धोका होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले होते.  त्यावेळी अनेकांनी धमक्या दिल्या उडवून टाकू, ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल तो रंग देशातून पुसून टाकू असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मंदिरात चक्क देवीच्या मूर्तीसमोर चोरी; टोळीने सर्वांसमोर साधला डाव, पाहा VIDEO

'सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. हल्ली विचारांचं पायपोस कुणाला राहिलं नाही. मोहन भागवत यांचे विचार काय आहे तर आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का? एकीकडे तुम्ही हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

'आमचं हिदुत्व म्हणजे, राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी सांगितलं आहे, माणूस म्हणून पहिला जन्माला येत असतो, घरात असल्यावर माणूस असतो आणि जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा देश हा माझा धर्म आहे म्हणून वाटचाल करतो. त्यावेळी जर कुणी आपल्या धर्माची मस्ती घेऊन वाटेत येत असेल तर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभं राहणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानचा 'विराट कोहली'; 'बॉल बॉय' ते पाकिस्ताचा कॅप्टन... थक्क करणारा प्रवास

'हिंदू राष्ट्र हा संघ जेव्हा शब्द वापरतो. तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. सत्तेसाठी संघर्ष करत असताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको, आता तुमच्या वर्गातून जी माणसं बाहेर पडली आहे, त्यांनी सत्ता काबिज केली आहे. त्यांना एकदा शिकवणी लावा. सध्या जो काही खेळ चालू आहे, सर्व काही करायचं आहे पण मला सत्ता हवी आहे. सत्तेचं व्यसन हे एक अंमली प्रकार आहे आहे. अगदी बाजार उद्यान समित्यापासून ते  लोकसभेपर्यंत माझ्या अंमलाखाली पाहिजे, हा सुद्धा अंमली प्रकार आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

First published:

Tags: Rajnath singh, Uddhav Thackery