मुंबई, 8 जुलै : शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गमावणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खडसावलं. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील 10 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहूया 1)शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माणसं आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. कट्टर शिवसैनिक आहेत तोपर्यंत पक्षाच्या भवितव्याला धोका नाही. शिवसेनेनं साध्या माणसाला मोठं केलं’ 2) 15 ते 16 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसं जिथं असतात तिथं विजय हमखास असतो. 3)सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा. शिवसैनिकांनी संभ्रम मनात ठेवू नये.माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या १२ तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. 4) आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलतायत. या लोकांना आजही उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल आणि मातोश्रीबद्दल प्रेम आहे. खरंच धन्य झालो. 5) गेली 2-3 वर्षं विकृत भाषेत आमच्याविषयी बोलत होती, त्याच्याविरोधात कोणीही बोललं नाही.ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं 6) अडीच वर्षांपूर्वी हेच केलं असतं, तर सन्मानाने झालं असतं. मला वादविवाद होऊ द्यायचा नाही. माझ्याकडून मी शांतपणाने सांगतोय. मी सध्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही. 7) मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल. 8) सामान्य लोकांना शिवसेनेनं मोठं केलं याचा मला अभिमान आहे. जे लोक मोठे झाले ते गेले. त्यांना जाऊ द्या. आजही अनेक जण शिवसेनेसोबत आहेत. 9) कितीही आमदार जाऊ द्या पक्ष आपलाच राहील. पक्षसंघटन आणि विधिमंडळ हे वेगळं असतं 10) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.