Home /News /explainer /

Sheena bora murder case: इंद्राणीची लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री! वाचा केव्हा, कुठे काय घडलं?

Sheena bora murder case: इंद्राणीची लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री! वाचा केव्हा, कुठे काय घडलं?

Sheena bora murder case: इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर (SC Grants Bail to Indrani Mukerjee) करताना न्यायालयाने सांगितले की, साडेसहा वर्षे मुखर्जी यांनी तुरुंगात घालवलेला कालावधी खूप मोठा आहे आणि खटला नजीकच्या भविष्यात पूर्ण होणार नाही.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 18 मे : 10 वर्षांपूर्वीच्या शीना बोरा हत्या प्रकरणात (Sheena Bora Murder Case) सहभागी असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (indrani mukherjee) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन (SC Grants Bail to Indrani Mukerjee) मिळाला आहे. शीना बोरा गेल्या 7 वर्षांपासून मुंबई तुरुंगात बंद आहे. इंद्राणी मुखर्जीने तिची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे. इंद्राणी मुखर्जीला पोलिसांनी 2015 मध्ये अटक केली होती. शीना बोरा हत्याकांडाला 10 वर्षे पूर्ण झाली, पण आजही हे हत्याकांड गूढच आहे. 2012 मध्ये या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. सीबीआयने या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही केला होता. मात्र, हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केली होती. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती. या प्रकरणात, सस्पेन्स सतत वाढत गेला. चला सविस्तर जाणून घेऊ. डिसेंबर 2021 मध्ये शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जी यांनी सीबीआयला पत्र लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना सांगितले की, तिची मुलगी जिवंत आहे आणि ती सध्या काश्मीरमध्ये आहे, त्यामुळे तपास यंत्रणेने तिचा शोध सुरू करावा. परिणामी शीना बोरा हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते. जवळपास दशकभरापूर्वी मुंबईतील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती, ज्यामुळे मायलेकीच्या नात्याला काळीमा फासला गेला. हाय प्रोफाईल केस सविस्तर जाणून घ्या तिच्यावर प्रेम करणारा मुलगा नात्यात तिचा सावत्र भाऊ असल्यानं आईला आपल्या मुलीला मारावं लागलं? तपासादरम्यान एकामागून एक इतक्या नाट्यमय घडामोडी समोर आल्या की हे संपूर्ण प्रकरण एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखे बनले. शीना बोराच्या हत्येनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता की, एका आईने आपल्या मुलीची हत्या का केली? या हायप्रोफाईल प्रकरणात केव्हा, कसे आणि काय घडले हे तारखेनुसार पाहू. 2 मे 2012 :- महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला, स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहामुळे , तिची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक अहवालासाठी पाठवला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

  Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्याालयीन कोठडी

  तीन वर्षांपासून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. मात्र, ठोस काही निष्पन्न झाले नाही. 2015 मध्ये पोलिसांना याबाबत थोडी माहिती मिळाली. 21 ऑगस्ट 2015: मुंबई पोलिसांनी 21 ऑगस्ट 2015 रोजी 43 वर्षीय श्याम मनोहर राय याला अटक केली. ही व्यक्ती इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर असल्याचे समोर आले. अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने जास्त काही सांगितलं नाही. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्या व्यक्तीने 2012 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांकडे कबूल केले. मुंबई आणि रायगड पोलिसांनी तपास सुरू श्याम मनोहर राय याने पोलिसांना सांगितले की, एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करून मृतदेह रायगडच्या जंगलात जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरला. रायगड पोलिसांसह मुंबई पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या तपासात गुंतले. श्याम मनोहर राय याच्या सांगण्यावरून एका महिलेच्या मृतदेहाचे काही अवशेष जंगलात उत्खननात सापडले. या हत्याकांडाच्या तळापर्यंत जाण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न होता, त्यामुळे पोलिसांनी श्याम मनोहर राय यांची चौकशी सुरू केली. राय याने पोलिसांसमोर खरे बोलण्यास सुरुवात केली. मनोहर राय याने सांगितले की, काही काळापूर्वी तो पीटर मुखर्जीची पत्नी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर होता. इंद्राणीच्या सांगण्यावरून त्याने शीना बोराची गळा आवळून हत्या केली, एवढेच नाही तर कुणालाही कळू नये म्हणून त्याने मृतदेह रायगडच्या जंगलात पुरला.

  Sheena Bora हत्याकांड प्रकरण: Indrani Mukherjea ला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

  या खुलाशानंतर मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीला तिच्या मुंबईतील घरातून अटक केली. इंद्राणी मुखर्जीने तिच्यावरील आरोपांचे खंडन करणे सुरूच ठेवले. परंतु, ती म्हणाली की शीना आपली बहीण आहे आणि ती तीन वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. पण, जेव्हा मुंबई पोलिसांनी श्याम मनोहर राय आणि तिला समोरासमोर आणलं तेव्हा तिने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. आईनेच रचला मुलीच्या हत्येचा कट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी आणि शीनाचे संबंध चांगले नव्हते, शीना बोरा ही इंद्राणीच्या पहिल्या पतीची अपत्य होती, इंद्राणी शीनामध्ये दररोज वाद व्हायचे. इंद्राणीने तिच्या ड्रायव्हरसोबत शीनाच्या हत्येचा कट रचला. 2 मे 2012 रोजी इंद्राणीने शीनाला भेटण्यासाठी वांद्रे येथे बोलावले. मग तिला गाडीत बसवले. कारमध्ये ड्रायव्हर श्याम राय व्यतिरिक्त एक व्यक्ती आणि एक थाई होता. यानंतर शीनाचा कारमध्येच गळा दाबून खून करण्यात आला. इंद्राणीने चालक मनोहर राय याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. ड्रायव्हर रायने मृतदेह मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या रायगडच्या जंगलात नेला. आधी त्याने जाळण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरुन तो परतला. या प्रकरणी पोलिसांनी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी आणि मुलगा राहुल यांचीही चौकशी केली. नंतर पीटरला अटक करण्यात आली. पीटर मुखर्जी हे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पीटरने 2002 मध्ये इंद्राणीशी लग्न केले. पीटरचे हे दुसरे लग्न होते. इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना यालाही कोलकाता येथून अटक करण्यात आली होती.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Supreme court

  पुढील बातम्या