मुंबई, 08 सप्टेंबर : सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणी तपासातून आणखीन नवीन ट्वीस्ट समोर येत आहे. सुशांतच्या बहिणीविरोधात रिया चक्रवर्तीनं वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
सुशांतची बहिण प्रियांका, मितू आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रियानं या तिघांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे.
Maharastra: Based on a complaint filed by actor Rhea Chakraborty, a case has been registered against late actor Sushant Singh Rajput's sister Priyanka Singh, Dr Tarun Kumar (of RML Hospital, Delhi) & others under sections of IPC & NDPS Act at Bandra Police Station in Mumbai. https://t.co/Nsi7rr17bI
सुशांतचा आजार माहित असून देखील त्याबाबत सुशांतच्या घरच्यांनी माहिती लपवली, डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय सुशांतला औषधे दिली, अंमली पदार्थांचे सेवन करणे असे आरोप रियाने केलेत एवढच नाही तर सुशांतची बहिण मितू सिंग ही 8 जून ते 12 जून सुशांत सोबत होती याकाळातच सुशांतची तब्येत बिघडली आणि त्याला जबाबदार मितू सिंग आहे असं ही रियाने आपल्या तक्रारारीत म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला ड्रग्जच्या अँगलमुळे आता नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या भावाला- शोविक चक्रवर्ती याला NCB ने अटक केली आहे. याशिवाय सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडासुद्धा NCB च्या अटकेत आहे.