Home /News /mumbai /

Shiv Sena Rally: "बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार" - संजय राऊत

Shiv Sena Rally: "बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार" - संजय राऊत

Shiv Sena Rally in Mumbai: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री विरोधकांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर देणार आहेत.

  मुंबई, 14 मे : शिवसेनेचे आज मुंबईत जाहीर सभा (Shiv Sena Rally in Mumbai) होणार आहे. शिवसेनेची ही सभा मास्टर ब्लास्टर असणार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची आज होणारी सभा ही आतापर्यंत झालेल्या 100 सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळात इतक्या मोठ्या सभा झाल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे अशाप्रकारच्या जाहीर सभेला संबोधित करतील. या सभेचं व्यासपीठ आपण पाहिलं तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नाही. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचं आयोजन केलं आहे. गेल्या दोन-अडिच वर्षांपासून आमचे हजारो, लाखो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाची वाट पाहत होते. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेतली आहे. बैठका घेतल्या आहेत पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातील, देशाचं वातावरण आणि या वातावरणावर आलेला गढूळपणा आजय्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि इथे फक्त भगव्या रंगाचं धनुष्यच आकाशात तुम्हाला दिसेल असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललं आहे. काही लोक हे राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण अडथळे निर्ण करत आहेत. काहींना पोटदुखी होत आहे. या पोटदुखीवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. वाचा : "तुमच्यात ताकद असेल तर...." नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान कुणाचा बुस्टर डोस मला माहिती नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल. आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टर ब्लास्टर आहोत. शिवसेना आणि गर्दी यांचं एक नातं, समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचा मराठी माणसाच्या संदर्भातील विचार हे एक लोहचुंबक आहे यामागे लोक आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्र आणि देशाला लागलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी ही सभा असे असंही संज राऊत म्हणाले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Sanjay raut, Shiv sena, Uddhav thackeray

  पुढील बातम्या