मुंबई,1 जानेवारी: संपूर्ण देश नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न असताना 'नाराज' असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या फेसबुक पोस्टमुळे नव्या चर्चेला ऊत आला आहे. 'हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपके ये तीन भेट दी हो, साथ, समय और समर्पण...' अशी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आणखी दुरावा वाढला आहे का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी 'ट्विटर'वर आपल्या हटके अंदाजात नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊत नाराज..?
बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत हे ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थीत होते. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. रम्यान, आपण नाराज नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र, या विस्ताराविरोधात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीतली नाराजी उघड झाली होती. काँग्रेसमध्येही कुरबूर सुरू आहे. आता शिवसेनेतही नाराजीचे सूर उमटू लागले असून अंतर्गत वाद उफाळून आलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे गुहागरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनीही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलीय. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या नाराजी नाट्यामुळे आमदारांमध्ये असंतोष वाढतोय. तर आघाडी सरकारमुळे सगळ्याच पक्षांना आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेताना मर्यादा येत असल्याने असंतुष्ट आमदारांची नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न शिवसेनेच्या नेतृत्वापुढे निर्माण झालाय.
भास्कर जाधव म्हणाले, मी राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदही भूषवलंय. एवढा अनुभव असताना मी कुठे कमी पडतोय ते मला कळत नाही. शिवसेनेनेत पक्ष प्रवेश करताना माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यांनीही आश्वासनं दिली होती. मात्र ती पाळली गेली नाहीत. मला कशाचा मोह नाही, मात्र दिलेलं आश्वासन पाळायला पाहिजे.
पुण्यात संग्राम थोपटेंचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेस भवन फोडलं
दरम्यान पीएन समर्थकांचा बुधवारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षात राहण्याबद्दल आमदार पी. एन. पाटील(P. N. Patil) यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होऊ शकतो. असं असलं तरी पक्षावर नाराज असलेल्या पी. एन. पाटील यांनी सध्या तरी या सगळ्या प्रकारावर मौन बाळगलय. तसं झालं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. त्यामुळे पाटील यांच्या 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.