Home /News /mumbai /

शिवसेनेच्या आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, आणि.... आमदाराने सांगितला रात्रीचा थरार

शिवसेनेच्या आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, आणि.... आमदाराने सांगितला रात्रीचा थरार

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेल्या शिवसेना आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

    मुंबई, 21 जून : शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. शिंदे यांना जवळपास 35 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला जातोय. शिंदे सध्या आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेच्या एवढ्या आमदारांनी थेट पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून अशाप्रकारचं धाडस केल्याने राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेल्या शिवसेना आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनाचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटले आहेत. त्यानंतर त्यांनी काल रात्री नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या याबाबत माहिती दिली आहे. शिवसेनेच्या आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले होते. पण त्या गटातून ते मोठ्या शिताफीने निसटले. विधान परिषदेच्या निकालानंतर काल साहेबांनी ठाण्यात एकेठिकाणी जेवणासाठी बोलावलं असं सांगण्यात आलं होतं. पण साहेब कोणते ते स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. कैलास पाटील हे ठाण्याहून गुजरातला निघालेल्या गाडीमध्ये बसले होते. पण त्यांना प्रवासादरम्यान संशय आला. त्यानंतर त्यांना सगळा कट समजला. मुंबईपासून जवळपास 40 ते 50 किमी लांब गाडी गेल्यानंतर कैलास पाटील यांनी लघूशंकेचा बहाणा केला. तोपर्यंत गाडी ही मुंबईपासून 100 किमी पेक्षाही जास्त लांब गेली होती. (शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? गृह खात्याकडून मारहाणीची दखल) कैलास पाटील हे लघुशंकेच्या नावाने गाडीतून बाहेर पडले त्यानंतर ते पळत जावून तिथून निसटले. भर पावसात सलग चार ते पाच तास पायी चालल्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर ते एका ट्रॅक्टरच्या मदतीने दहीसरपर्यंत आले. या सर्व घटनाक्रमानंतर कैलास पाटील 'मातोश्री'वर दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबंधित प्रकाराची माहिती दिली. ते आज दिवसभरापासून 'वर्षा' बंगल्यावर आहेत. ते शिवसेनेच्या आजच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी झाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या