ईडीविरोधात लढ्यासाठी संजय राऊत घेणार कायदेशीर सल्ला, सेनेचा मोठा नेता भेटीला!

ईडीविरोधात लढ्यासाठी संजय राऊत घेणार कायदेशीर सल्ला, सेनेचा मोठा नेता भेटीला!

'नोटीस पाहण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, ते आम्हाला चांगले माहिती आहे'

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Mp Sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे.  आज ईडीच्या चौकशी वर्षा राऊत पोहोचल्या नाही. तर दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी सामना ऑफिसमध्ये भेट घेतली. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ED ने नोटीस बजावली आहे. त्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ही भेट झाली असल्याची माहिती मिळत आहे.

राज्याप्रमाणेच CBSE बोर्डालाही चालणार फॉर्म नंबर 17? उपसभापतींकडून सूचना

तर आज सकाळी पत्रकारांशी बोलत असताना 'वर्षा राऊत यांना नोटीस देण्यात आली म्हणून त्या आज चौकशीला जाणार नाही. आम्ही ईडीकडे दोन-चार दिवसांची मुदत मागितली आहे, असंही राऊत यांनी सांगितले होते. ईडीकडून त्यांच्या पत्नीला 3 नोटीस आहे.

'आम्हाला जी नोटीस देण्यात आली आहे. ती मी अद्याप  पाहिली नाही. ती नोटीस पाहण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, ते आम्हाला चांगले माहिती आहे.  माझ्याकडे भाजपच्या नेत्यांची यादी आहे. त्यांनी केलेल्या व्यवहाराची पूर्ण कागदपत्र तयार आहे. ही यादी दिल्यानंतर ईडीला जास्त काम मिळणार आहे, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला होता.

'टारझन द वंडर कार' बनवणाऱ्या दिलीप छाब्रियांना अटक, काय आहे प्रकरण?

'ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. माझ्याकडेही ईडीला देण्यासाठी बरीच कागदपत्र आहे. त्यामुळे नोटीसीला उत्तर हे नोटीसने दिले जाईल' असा इशाराही राऊत यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं.

वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते.  प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.  प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच  हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.

700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर

विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. पण, राऊत यांनी मुदतवाढ मागितली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 29, 2020, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या