आंबेडकरनगर, 11 मे : उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर (UP Ambedkarnagar) जिल्ह्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात विषारी साप (Venomous Snake) आढळून आले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराच्या आत ठेवलेल्या मातीच्या भांड्यात सापांचा समूह आढळून आला. सापांची संख्या 90 च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. (Cobra in house) घरात आढळणारे साप कोब्रा प्रजातीचे असल्याचे सांगितले जात आहे. मडक्यात विषारी सापांचा समूह मिळालेल्या माहितीनुसार, आलापूर तहसील हद्दीतील मदुआना गावात एका घरात जुने मातीचे भांडे ठेवले होते. मंगळवारी बऱ्याच दिवसांनी अचानक घरमालकाने ते मातीचे भांडे पाहिल्यानंतर त्यांच्या धक्का बसला. मडक्यात विषारी सापांचा समूह होता. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळल्याची बातमी पसरताच संपूर्ण गावात घबराट पसरली. काही वेळातच गावकऱ्यांनी गर्दी केली. कोणी याला निसर्गाचा कोप म्हणत आहेत तर कोणी साप दोष म्हणत आहेत. गावातील रहिवासी अनिल कुमार यांनी सांगितले की, सापांमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. हे वाचा - Pune: बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तोतया महिला पोलिसाला अटक वनविभागाने काय म्हटले सध्या या सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडण्याचे काम वनविभाग करत आहे. गावात आणखी दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे विषारी सापांचा समूह तर नाही ना, या विचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यासाठी गावाच्या आजूबाजूला सापांचा शोध घेता यावा, यासाठी गावकरी सर्पमित्राचा शोध घेत आहेत. त्याचवेळी अशा सापांचा शोध सुरू असल्याचे वनविभागाचे डीएफओ यांनी सांगितले. संपूर्ण परिसराची चौकशी केली जाईल. ग्रामस्थांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही वनविभागाने सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.