जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / डमी मतपेटी, दिग्गज नेते आणि फाईव्ह स्टार हॉटेल, शिवसेनेची आमदारांसाठी अनोखी रंगीत तालीम

डमी मतपेटी, दिग्गज नेते आणि फाईव्ह स्टार हॉटेल, शिवसेनेची आमदारांसाठी अनोखी रंगीत तालीम

डमी मतपेटी, दिग्गज नेते आणि फाईव्ह स्टार हॉटेल, शिवसेनेची आमदारांसाठी अनोखी रंगीत तालीम

आपल्या कोणत्याही आमदाराकडून पुन्हा तशी चूक होऊ नये यासाठी आता शिवसेना सतर्क झाली आहे. विशेषत: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज सर्व आमदारांची मतदानाची थेट रंगीत तालीमच घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरलं होतं. त्यामुळे शिवसेनेला एक मत कमी मिळालं होतं. आपल्या कोणत्याही आमदाराकडून पुन्हा तशी चूक होऊ नये यासाठी आता शिवसेना सतर्क झाली आहे. विशेषत: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज सर्व आमदारांची मतदानाची थेट रंगीत तालीमच घेतली. या रंगीत तालमीत सर्व आमदारांना प्रत्यक्ष मतदान कसं करावं याचं प्रात्याक्षिक दाखवलं गेलं. मतदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात याचं प्रात्याक्षिक दिलं गेलं. यावेळी डमी मतपेटी देखील होती. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची पवईच्या वेस्ट इन हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दरम्यान या सर्व आमदारांची आज वेस्ट इन हॉटेलवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदारदेखील उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत आमदारांना विधान परीषद निवडणुकीत मतदान कसं करावं याचं प्रत्यक्षिक दाखवलं गेलं. प्रत्यक्ष मतदानावेळी जशी मतदान प्रक्रिया असते तसी रंगीत तालीम करणारं प्रत्यक्षिक सर्व आमदारांकडून करून घेण्यात आलं. ( ज्यूस पिणाऱ्यांनो, सडलेल्या फळांचा विकत होते ज्यूस, भिवंडीतला किळसवाणा VIDEO ) या बैठकीला प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या रंगीत तालमीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मतदान कसं करावं, याची तपासणी होती. प्रत्येकाला मत टाकायला लावलं. मोजणी सुरु केली. कुणाचं मत चुकलं, काय चुकलं ते तपासलं गेलं. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत वाया गेलं. त्यासाठीच आता काळजी घेतली जात आहे. एक चुकलं म्हणून अजून कुणी जास्त चुकू नये. यासाठी सर्व काही सुरु आहे”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री आम्हाला मार्गदर्शन करतील ते आमच्यासाठी अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची आमच्यासोबत हितगूज होणार. मुख्यमंत्र्यांकडून दोन चांगले शब्द सांगितले जाणार”, असं बच्चू कडू म्हणाले. “राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांची मतंच फुटली नाहीत. ती फक्त गाजली, फुटली नाहीत. अपक्षांचे मतं फुटणारच नाही. सर्वजण आघाडीसोबत खूश आहेत. मागच्यावेळी देखील मते फुटली नाहीत. थोडाफार गणितामुळे बदल झाला”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात