जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ज्यूस पिणाऱ्यांनो, सडलेल्या फळांचा विकत होते ज्यूस, भिवंडीतला किळसवाणा VIDEO

ज्यूस पिणाऱ्यांनो, सडलेल्या फळांचा विकत होते ज्यूस, भिवंडीतला किळसवाणा VIDEO

अननस आणि इतक फळंही सडलेल्या अवस्थेत आढळून आली. एवढंच नाहीतर अननस इतके सडले होते की, त्यात अळ्या सुद्धा पडल्या होता.

अननस आणि इतक फळंही सडलेल्या अवस्थेत आढळून आली. एवढंच नाहीतर अननस इतके सडले होते की, त्यात अळ्या सुद्धा पडल्या होता.

अननस आणि इतक फळंही सडलेल्या अवस्थेत आढळून आली. एवढंच नाहीतर अननस इतके सडले होते की, त्यात अळ्या सुद्धा पडल्या होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 18 जून :   फळांचा ज्यूस (fruit juice ) हा आरोग्यासाठी चांगलाच लाभदायक असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी फळांचा ज्यूस घ्या असा सल्ला देत असतात. पण, भिवंडीमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भिवंडी शहरातील टेमघर येथील साईबाबा मंदिरा समोर हा प्रकार घडला आहे. साईबाबा मंदिरासमोर एक ज्युसवाला चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस  बनवून विकत असल्याचा पदार्फाश झाला आहे.

आज सकाळी स्थानिक नागरिक ज्यूस घेण्यासाठी दुकानावर गेले होते. त्यामुळे एका व्यक्तीला अननस आणि इतक फळंही सडलेल्या अवस्थेत आढळून आली. एवढंच नाहीतर अननस इतके सडले होते की, त्यात अळ्या सुद्धा पडल्या होता. अशा फळांचा ज्यूस लोकांना देतात का? असा सवाल करत एका जागृक नागरिकाने हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. या जागृक  नागरिकांने दर्शनास आले असताना त्याने ज्यूस च्या हातगाडीवरील सडलेली फळे त्यात पडलेले किडे याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या फळ विक्रेत्याला बेदम चोप दिला आणि सर्व फळं फेकून दिली. ( भरभर खाण्याची सवय असेल तर लगेच बदला, अनेक आजारांना आहे निमंत्रण! ) त्यामुळे उघड्यावर असलेल्या ज्यूस विक्रेत्याकडून जर ज्यूस घेणार असाल तर आधी फळे तपासून पहा नंतर ज्यूस बनवायला सांगा अन्यथा आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यतो. त्यामुळे प्रशासन या ज्यूसवाल्यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात