मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Shiv Sen vs Rane: नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेची मुंबई पोलिसांत तक्रार, कणकवली पोलिसांनीही बाजावली नोटीस

Shiv Sen vs Rane: नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेची मुंबई पोलिसांत तक्रार, कणकवली पोलिसांनीही बाजावली नोटीस

Shiv Sena vs Rane: भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

Shiv Sena vs Rane: भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

Shiv Sena vs Rane: भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

मुंबई, 23 डिसेंबर : भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक (Shivsainik) चांगलेच संतापले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहीती ट्विटरद्वारे पसरवल्याचं सांगत काल रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Shiv Sena files complaint against Nitesh Rane in Mumbai)

तर कणवलीत स्थानिक शिवसेना पदाधिकारी संतोष परब याच्यावर नितेश राणे समर्थकांकडून प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी, आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. एकीकडे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सरू असतना पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पहायला मिळतोय.

आपल्या तक्रारीत शिवसेनेने म्हटले, नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहून शिवसेनेचे नाव बदलणार का? असे लिहिल्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आमचे दैवत असून तीव्र भावना दुखावल्याबद्दल नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात यावा. तसेच त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावे.

वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

आमदार नितेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट केलं होतं. ज्यात म्हटलं होतं, हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे.

राणीच्या बागेत नवी कोनशिला

मुंबईच्या भायखळा येथील राणीच्या बागेचं अर्थात राजमाता जीजामाता उद्यान हे नाव बदललं की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. हा प्रश्न किंवा चर्चा उपस्थित होण्यामागे कारणदेखील तसंच आहे. राणीच्या बागेत एक नवीन कोनशिला उभारण्यात आली आहे. या कोनशिलेवर हजरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटकही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे राणीच्या बागेचं नाव खरंच बदलणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ती कोनशिला आधीपासूनच होती, असा दावा केला आहे.

"ही कोनशिला अचानक आलेली नाहीये. राणीचा बाग मी स्वत: जावून पाहिली आहे. तिथे पीर बाबा हे अतिशय जुनं स्थान आहे. ते एकाबाजूला आहे. त्यामुळे वीर जीजामाता राणीचा बाग हे नाव पीर बाबा नावाने बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींवरुन राईचा पर्वत करत असतील तर आश्चर्य आहे. मुळात ही कोनशिला तिथे आहेच. तिथे पीर बाबांचं स्थान आहे. ते आज आणि काल नाही झालंय. ते अनेक दिवसांपासून आहे. तिथे हिंदू-मुस्लिम सगळे जातात", अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

First published:

Tags: Nitesh rane, Shiv sena