Home /News /mumbai /

Aaditya Thackeray: मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

Aaditya Thackeray: मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मंत्री आदित्य ठाकरे, फाईल फोटो

मंत्री आदित्य ठाकरे, फाईल फोटो

Man arrest who sends threat message to Minister Aaditya Thackeray: राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बंगळुरू येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber cell) ही कारवाई केली आहे. आरोपी 34 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअपवर पाठवला होता मेसेज इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री आदित्य ठाकरे यांना 8 डिसेंबर रोजी व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. या मेसेजच्या माध्यमातून आरोपीने मंत्री आदित्य ठाकरे यांन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला जबाबदार धरत आरोप केले होते. आरोपीने आपल्या मेसेजमधून आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत आरोप केल होते. आरोपीने सुरुवातीला मंत्री आदित्य ठाकरे यांना फोन कॉल केला. मात्र, फोन रिसिव्ह न झाल्याने आरोपीने आदित्य ठाकरे यांना व्हॉ़ट्सअपवर धमकी देणारा मेसेज पाठवला. वाचा : "भाजपचं हिंदुत्व म्हणजे 'चोरबाजार'; देश विकलात पण अयोध्या विकता येणार नाही, कारण..." धमकीचा मेसेज आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस आपला तपास करत होते. याच दरम्यान आरोपी हा बंगळुरू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या आरोपीला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आरोपी जयसिंग राजपूत याला 18 डिसेंबर रोजी अटक कऱण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यावर त्याला बंगळुरू येथून मुंबईत आणण्यात आले. आरोपी हा सुशांत सिंह राजपूत याचा फॅन असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तांत्रिकदृष्ट्या तपास केला आणि आरोपी बंगळुरू येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बंगळुरू येथे गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. वाचा : 'आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार' गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांना आला होता धमकीचा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानावर 5 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 11 च्या सुमारास दुबईवरून अज्ञान व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 4 फोन कॉल रात्री 11 च्या सुमारास मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मातोश्रीवर आलेल्या फोन धमकीनंतर मातोश्री निवास्थानाची आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Bengaluru, Mumbai

    पुढील बातम्या