मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

जीजामातांचं नाव असलेल्या राणीच्या बागेत नवी कोनशिला, हजरत पीर बाबा राणीबाग असा उल्लेख

जीजामातांचं नाव असलेल्या राणीच्या बागेत नवी कोनशिला, हजरत पीर बाबा राणीबाग असा उल्लेख

राणीच्या बागेत एक नवीन कोनशिला उभारण्यात आली आहे. या कोनशिलेवर हजरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटकही (tourist) संभ्रमात पडले आहेत.

राणीच्या बागेत एक नवीन कोनशिला उभारण्यात आली आहे. या कोनशिलेवर हजरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटकही (tourist) संभ्रमात पडले आहेत.

राणीच्या बागेत एक नवीन कोनशिला उभारण्यात आली आहे. या कोनशिलेवर हजरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटकही (tourist) संभ्रमात पडले आहेत.

मुंबई, 21 डिसेंबर : मुंबईच्या (Mumbai) भायखळा (Byculla) येथील राणीच्या बागेचं (Ranichi Baug) अर्थात राजमाता जीजामाता उद्यान (Jijamata Udyan Zoo) हे नाव बदललं की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. हा प्रश्न किंवा चर्चा उपस्थित होण्यामागे कारणदेखील तसंच आहे. राणीच्या बागेत एक नवीन कोनशिला उभारण्यात आली आहे. या कोनशिलेवर हजरत पीर बाबा राणीबाग असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटकही (tourist) संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे राणीच्या बागेचं नाव खरंच बदलणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ती कोनशिला आधीपासूनच होती, असा दावा केला आहे.

'कोनशिला अचानक आलेली नाही'

"ही कोनशिला अचानक आलेली नाहीय. राणीचा बाग मी स्वत: जावून पाहिली आहे. तिथे पीर बाबा हे अतिशय जुनं स्थान आहे. ते एकाबाजूला आहे. त्यामुळे वीर जीजामाता राणीचा बाग हे नाव पीर बाबा नावाने बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींवरुन राईचा पर्वत करत असतील तर आश्चर्य आहे. मुळात ही कोनशिला तिथे आहेच. तिथे पीर बाबांचं स्थान आहे. ते आज आणि काल नाही झालंय. ते अनेक दिवसांपासून आहे. तिथे हिंदू-मुस्लिम सगळे जातात", अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा : राज्यात Omicron चा धोका वाढला, रुग्णांची संख्या पोहोचली 65 वर

"संबंधित कोनशिला उभारण्यासाठी परवानगी दिली गेलीय की नाही याची चौकशी करण्यासाठी आजच मी संबंधित विभागाशी संपर्क केला आहे. परवानगीचा प्रस्ताव नगरसेवक टाकतात. त्यांना परवानगी दिली जाते. पण तसं काही केलं नसेल तर नक्की काढून घेईल. मात्र राणीच्या बागेचं नाव बदलणार का? असा जो पतंगगड बांधला जातोय या मताशी मी सहमत नाही. मला ते आवडत नाहीय. कारण तसा प्रश्नच उद्भवत नाही", अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी मांडली. दरम्यान, या कोनशिलेवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंचे संकुचित विचार असल्याची टीका केली.

" isDesktop="true" id="646869" >

हेही वाचा : एकदम भारी! बस थांब्यावर प्रतीक्षा करण्याची गरज संपली, मुंबईकरांसाठी खुशखबर

नितेश राणेंची सडकून टीका

दरम्यान, या कोनशिलेवरुन नितेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. "मुंबईचं पश्चिम बंगालीकरण करणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आधी हिंदू सणांना संपवणं, हिंदूंची गळचेपी मुंबईत करणं, आतातर ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेबांच्या नावालाच पुसण्याचं काम या निर्लज्ज शिवसेनेच्या सत्तेमध्ये असलेल्या महापालिकेनं केलं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. ज्या शिवराय आणि भगला झेंडा घेऊन ते राजकारण करतात आणि स्वत:चा पक्ष वाढवतात त्या जिजाऊंचंच नाव पुसण्याचं काम शिवसेना आणि मुंबई महापालिकेनं केलं आहे. त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. कारण मुंबईत हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर शिवसेना मुक्त केल्याशिवाय शक्य नाही", असा घणाघात नितेश राणेंनी केला.

First published: