Home /News /mumbai /

शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

कोणकोणत्या आमदारांवर होणार कारवाई?

    मुंबई, 23 जून : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे. मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. या नेत्यांची आमदारकी रद्द करा - शिवसेना एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यामिनी जाधव संजय शिरसाठ बालाजी किणीकर तानाजी सावंत संदिपाम भुमरे भारत गोगावले लता सोनावणे अनिल बाबर महेश शिंदे प्रकाश सुर्वे आताची राजकीय अपडेट.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. या सर्व घटनेनंतर नारायण राणे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि शेवटी स्वत:च पवारांना धमकी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Udhhav Thakeray

    पुढील बातम्या