जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 डिसेंबर: शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजप (BJP) असा वाद सध्या सुरू आहे. भाजप नेते (BJP leader) आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्या बद्दल अवमान करणारं आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद सुरु झाला आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेनं केलेल्या बॅनरबाजीमध्ये आशिष शेलार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या बॅनरबाजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा-   Corona Virus Mumbai: मुंबईकरांसाठी तब्बल 55 दिवसांनंतर Big Good News..!   महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आशिष शेलार यांच्या संदर्भात जी पोस्टरबाजी झाली ती मी पाहिली नाही. तसंच पुढे त्यांनी म्हटलं की, जेव्हा दोन नेत्यांचा वाद होत असतो तेव्हा इतर जण याचा गैरफायदा घेत असतात. त्यामुळे हे नक्की कोणी केलंय हे तपासायला हवं. शिवसैनिकांनी केलं असतं तर ते नावानिशी केलं असतं, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावलं आहे. या बॅनरवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय. अशी उडवली खिल्ली ‘कसं काय शेलार बरं हाय का? काल काय एैकलं ते खरं हाय का ? काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला? आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , shivsena
  • First Published :
जाहिरात
जाहिरात