मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांसाठी तब्बल 55 दिवसांनंतर दिलासादायक बातमी, दिवसभरात एकही मृत्यूची नोंद नाही

मुंबईकरांसाठी तब्बल 55 दिवसांनंतर दिलासादायक बातमी, दिवसभरात एकही मृत्यूची नोंद नाही

याआधी 18 ऑक्टोबरला मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मुंबई पालिकेत्या आरोग्य विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

याआधी 18 ऑक्टोबरला मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मुंबई पालिकेत्या आरोग्य विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

याआधी 18 ऑक्टोबरला मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मुंबई पालिकेत्या आरोग्य विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबई, 12 डिसेंबर: एकीकडे कोरोना व्हायरसच्या (Corona virus) ओमायक्रॉनच्या (Omicrom Varient) नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली असताना दुसरीकडे मुंबईकरांना (Mumbai) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी मुंबईत 55 दिवसांनंतर पुन्हा एकदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. याआधी 18 ऑक्टोबरला मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मुंबई पालिकेत्या आरोग्य विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

शनिवारी मुंबईत 256 रुग्ण आढळून आले तर शून्य मृत्यूची नोंद झाली. काल 221 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 65 हजार 110 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 16 हजार 355 वर पोहोचला आहे. सध्या 1 हजार 808 रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा- टीम इंडियाचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्मा आज पहिल्यांदाच घेणार विराट कोहलीची भेट 

शहर उपनगरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाख 44 हजार 370 वर आहे. तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईत 4 ते 10 डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.03 % टक्के आहे. शहर उपनगरांत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 2 हजार 592 दिवसांवर आहे.

चांगली बाब म्हणजे मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही आहे. मात्र रुग्ण आढळून आल्यानं 11 इमारती सील केल्या आहेत. शनिवारी दिवसभरात 44,380 चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांपैकी 135 रुग्णांची प्रकृती पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद करण्यात आली आहे. तर 939 रुग्ण लक्षणविरहित आहेत, 699 रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळून आली आहेत.

Omicron रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका राबवणार धारावी पॅटर्न 2

ओमायक्रॉनने मुंबईतील धारावीत शिरकाव (Omicron case detect in Dharavi Mumbai) केला. धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. धारावी पॅटर्न यशस्वी झाल्यावर आता मुंबई महानगरपालिकेने धारावीतील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी धारावी पॅटर्न 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC will implement Dharavi pattern 2 to prevent omicron)

हेही वाचा- भीषण अपघात: बसच्या धडकेत तीन मजुरांचा गेला जीव, 15 जण जखमी

मुंबई महानगरपालिकेच्या धारावी पॅटर्नची चर्चा केवळ मुंबई, महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात झाली होती. धारावी पॅटर्न यशस्वी झाल्यावर आता मुंबई महानगरपालिकेने धारावी पॅटर्न 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापद्धतीने मुंबई मनपाने नियोजन सुद्धा केलं आहे. धारावी पॅटर्न 2 मध्ये T-4 फॉर्म्युला राबवण्यात येणार आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona vaccination, Coronavirus