Home /News /kolhapur /

अभिमानास्पद! कोल्हापुरच्या लेकीची आकाशाला गवसणी, जगप्रसिद्ध कंपनीच्या CEO पदी वर्णी

अभिमानास्पद! कोल्हापुरच्या लेकीची आकाशाला गवसणी, जगप्रसिद्ध कंपनीच्या CEO पदी वर्णी

मूळच्या कोल्हापुरातील (Kolhapur) रहिवासी असणाऱ्या लीना नायर (Leena Nair) यांची जगप्रसिद्ध 'शैनल' या फ्रेंच कंपनीत सीईओ पदी नियुक्ती (CEO of chanel company) करण्यात आली आहे.

    कोल्हापूर, 16 डिसेंबर: जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपनीच्या सीईओ पदी अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनेक भारतीय वंशाच्या लोकांची वर्णी लागली आहे. गुगलच्या सीईओपदी सुंदर पिचई तर मायक्रोसॉफ्ट कंपनीत सत्या नडेला, अॅडोबमध्ये शंतनू नारायण, आयबीएममध्ये अरविंद कृष्णा, व्ही एम वेअरमध्ये रघु रघुराम तर अलीकडेच ट्विटर सोशल नेटवर्कींग साइटचे सीईओ म्हणून पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. मूळच्या कोल्हापुरातील (Kolhapur) रहिवासी असणाऱ्या लीना नायर (Leena Nair) यांची जगप्रसिद्ध 'शैनल' या फ्रेंच कंपनीत सीईओ पदी नियुक्ती (CEO of chanel company) करण्यात आली आहे. शैनल कंपनीकडून मंगळवारी ही घोषणा करण्यात आल्यानंतर, लीना यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. 52 वर्षीय लीना नायर यांनी गेली अनेक वर्षे युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) म्हणून काम केलं आहे. युनिलिव्हर कंपनीत लीना यांनी केलेल्या भरीव कामाची  दखल घेत, शैनल कंपनीनं त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. हेही वाचा- Twitterच्या CEO पदी नियुक्तीनंतर पराग अग्रवाल यांच्यावर टीकेचा भडिमार; काय आहे कारण? कोल्हापुरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेकांनी लीना नायर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लीना नायर यांच्या कामाचं कौतुक करताना, युनिलिव्हरचे सीईओ अॅलन जोप यांनी सांगितलं की, गेल्या तीस वर्षांपासून लीना नायर यांनी आमच्या कंपनीत काम केलं असून त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. त्यांच्या कामगिरीबाबत आम्हाला आदर वाटतो. हेही वाचा- जगभर पसरतोय 'Indian CEO virus', यावर लस नाही; पराग अग्रवाल यांना आनंद महिंद्रांच्या हटके शुभेच्छा लीना नायर या मूळच्या कोल्हापुरातील रहिवासी आहेत. कोल्हापुरातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कुलमध्ये त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी त्यांनी सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी जमशेदपूर येथील झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केलं आहे. 1992 साली लीना नायर यांनी युनिलिव्हर कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हेही वाचा- Parag Agrwal Twitter New CEO : इलॉन मस्क यांचं ट्वीट वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल त्यांनतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 2013 साली लीना लंडनला स्थायिक झाल्या. याठिकाणी त्यांनी अँग्लो डच कंपनीच्या मुख्यालयात नेतृत्व व संघटना विकास विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला होता. यानंतर त्यांना बढती मिळाली होती. युनिलिव्हर कंपनीच्या पहिल्या महिला सीएचआरओ बनण्याचा मान लीना यांना मिळाला होता. यानंतर त्यांची कारकीर्द आणखीच बहरत गेली. त्यांनी कंपनीतील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या