Home /News /lifestyle /

International Yoga Day 2022: गायक व्हायचंय? सुरेल आवाजासाठी करा 'हा' योगाभ्यास

International Yoga Day 2022: गायक व्हायचंय? सुरेल आवाजासाठी करा 'हा' योगाभ्यास

जर तुम्हाला गायक (Singer) व्हायचं असेल किंवा आशा भोसले यांच्यासारखं प्रसिद्ध गायिका व्हायचं असेल तर काही गोष्टींचा योगाभ्यास (Yoga) करणे गरजेचे आहे, ते कोणते आणि कसे ते आपण पाहूया.

  दिल्ली, 8 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय योग दिवस अर्थात International Yoga Day याच महिन्यात आहे.  जगभरात योगासनांचे आरोग्यदायी फायदे आता परिचित झाले आहेत. पण फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही योगामुळे वाढतं. तसंच गायनासारखी कला अधिक चांगल्या प्रकारे अवगत करायची असेल तर योगासनांचा आधार अवश्य घ्यावा. आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकेने गात्या गळ्यासाठी योगसाधना कशी आवश्यक आहे, हे अनेकदा विविध मुलाखतींमधून सांगितलं आहे. नवोदित गायक आशा भोसलेंची नक्कल करताना दिसतात. पण त्यामागाची साधना लक्षात घेत नाहीत. तुम्हाला गायक (Singer) व्हायचं असेल किंवा आशा भोसले यांच्यासारखं प्रदीर्घ काळ गाणं गायचं असेल तर योगाभ्यास (Yoga) करणे गरजेचे आहे, ते कोणते आणि कसे ते आपण पाहू या. भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम हा गळ्याच्या अनेक विकारांना दूर करतो. या प्राणायमाला सातत्याने केल्यास आवाजात मधूरता येते. त्याचबरोबर या प्राणायमामुळे मानसिक तणावही दूर होण्यास मदत होते. भ्रामरी प्राणायाम करण्याची योग्य पद्धत हा प्राणायम करताना सर्वात आधी पद्मासनात बसून डोळे मिटावे. त्यानंतर मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या दोन्ही हातांना हळूहळू खांद्यांपर्यंत न्यावे. त्यानंतर हळूहळू श्वास घ्यावा. आणि ही प्रक्रिया 10 मिनिटांपर्यंत करत रहावी.

  हे वाचा - Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?

   उज्जायी प्राणायाम
  उज्जायी प्राणायाम करत असताना समुद्रासारखा आवाज येतो. त्याला सातत्याने चांगल्या पद्धतीने करत राहील्यास घसा निरोगी राहतो. उज्जायी प्राणायाम करण्याची पद्धत हे आसन करण्यासाठी प्रथम चटईवर बसावे. त्यानंतर हळूहळू श्वास घेताना गाणं गाण्याचा प्रयत्न करावा. क्षमतेनुसार श्वास घेऊन नंतर तो हळूहळू सोडावा. सिंहासन सिंहासनात उच्चारण आणि सुराचा अभ्यास असतो. जो शब्दांचा स्पष्ट उच्चार काढण्यास मदत करतो. त्यामुळे ज्यांना गायक व्हायचं आहे, त्यांनी हा अभ्यास नक्की करायला हवा. सिंहासन करण्याची योग्य पद्धत सिंहासन करताना सर्वात आधी वज्रासनात बसावे. आणि आपले पंजे हे खालच्या बाजूला वाकवावे. त्यानंतर श्वास घेताना हातांना खांद्याकडे न्यावे. डोळ्यांना क्षमतेनुसार खोलून जीभही बाहेर काढावी आणि सिहासारखी गर्जना करण्याचा प्रयत्न करावा. (Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. News 18 Lokmat त्याची हमी देत नाही त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांशी संपर्क साधावा)
  Published by:Atik Shaikh
  First published:

  Tags: Health Tips, Singer, Yoga day

  पुढील बातम्या