मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटींच्या हिरोइनसह महिला तस्करला अटक

मुंबईत पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटींच्या हिरोइनसह महिला तस्करला अटक

Crime in Mumbai: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त करण्यात (seized 7 KG heroin) आलं आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त करण्यात (seized 7 Kg heroin) आलं आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांकडून ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत तब्बल 21 करोड इतके (seized 21 crore worth heroin) आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक (Smuggler woman arrested) केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी जुळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवाईबाबत खुलासा करण्यासाठी आज दुपारी साडे बारा वाजता मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राजस्थान आणि मुंबईशी असलेल्या ड्रग्स साखळीचा पर्दाफाश केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत आणखी कोणती माहिती उघड होणार याकडे सर्व माध्यमांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-आर्यन खान अटक प्रकरण : NCB विरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत NCB ने मुंबईत अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्कारांवर कारवाई केली आहे. संबंधित कारवाईत NCBने कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. यानंतर आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून महिलेला ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे तब्बल 7 किलो हिरोइन सापडलं आहे.

हेही वाचा-मुंबईत Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश, सेक्स टुरिझम असतं तरी काय?

याची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. पोलिसांनी ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे. तिच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांनी मिळाली असून मुंबईतील ड्रग्स तस्करीचं राजस्थान कनेक्शन देखील उघड झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drugs, Mumbai