मुंबई, 13 डिसेंबर: राज्यातील कोरोनाचा (Corona)संसर्ग आटोक्यात येत असुन मुंबईत आजपासुन पाहिले ते सातवीचे वर्ग सुरु झाले आहे. महापालिकेचे शिक्षणधिकारी राजु तडवी (Raju Tadavi) यांनी मुंबई महापालिकेतील शाळा बुधवार पासुन सुरु (Mumbai School Reopen) होतील असा आदेश जारी केला होता. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दोन वर्षानंतर शाळांचे दार उघडल्याने अनेक शांळामध्ये विविध पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. मुंबई येथील ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सांताक्लॉजने स्वागत केले आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन वर्षानंतर उघडले शाळेचे दार: ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सांताक्लॉजने स्वागत केले आहे. pic.twitter.com/3q1tAmrE9W
— News18Lokmat (@News18lokmat) December 15, 2021
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, असा संभ्रम पालकांन मध्ये होता. पण शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरु होतील आणि त्यात कोणताही बदल होणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितले होते. मुंबईतील बहुसंख्य पालक हे नोकरदार असून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ते कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत.
महापालिकेच्या आदेशानुसार शाळेत मुलाच्या व्यवस्थापनाची पुर्णपणे तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे. काही ठिकाणी ओमायक्रोनच्या भितीने विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या विनंती मध्ये आहे असे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.