मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पोहोचल्या शाळेत, विद्यार्थ्यांचं केलं स्वागत

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पोहोचल्या शाळेत, विद्यार्थ्यांचं केलं स्वागत

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

मुंबई, 04 ऑक्टोबर: तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील (Schools Reopen) शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळाही सुरु झाल्यात. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच स्वागत केलं. सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी भेट दिली. #BackToSchool अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. पहिल्या दिवसाच्या भावना जाणून घेतल्या.

राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत, यावर शाळा व्यवस्थापन कमिटी सातत्याने लक्ष ठेऊन आहे.

आजपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतल्या शाळेत अशी असेल नियमावली

एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.

शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल.

सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.

शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.

शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असेल.

मास्क घालणं अनिवार्य असेल.

शाळेत सॅनिटायजरचा वापर करणंही गरजेचं आहे.

हेही वाचा- विरोधी पक्षनेत्यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा, 'सामना'तून शिवसेनेची खोचक टिप्पणी

आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी सरकारचे आणखी कुठले नियम आहेत तसंच पालकांना आणि शिक्षकांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत हे जाणून घेऊया -

शाळा अनुकूल वातावरणात सुरू व्हाव्यात, यासाठी कृती आराखडा आखला आहे, त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन पूर्वतयारीबाबत व एकूणच परिस्थितीवर देखरेख ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनांनुसार, मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं. ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर केवळ एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा- पुरानी दुश्मनी; परब vs कदम, रामदास कदमांना होणार शिक्षा?

कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व आहे त्यामुळे वर्गातही योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेत प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात येतील. यासोबतच प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नसावा, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, अशी सूचना देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Varsha gaikwad