राज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम

‘राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. आमचा समाज त्यांना नक्कीच स्वीकारेल. पण राज ठाकरे जे करतायत ती केवळ स्टंटबाजी आहे’

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 01:33 PM IST

राज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम

मुंबई, 12 नोव्हेंबर : ‘उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणं ही तर राज ठाकरेंची स्टंटबाजी आहे,’ अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, अशी मागणीही संजय निरुपमांनी केली आहे.

‘राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. आमचा समाज त्यांना नक्कीच स्वीकारेल. पण राज ठाकरे जे करतायत ती केवळ स्टंटबाजी आहे,’ असं म्हणत संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘राज ठाकरेंना देव सुबुद्धी देवो. राज यांची लोकं उत्तर भारतीयांवर हल्ला करतात. हे हल्ले राज थांबवणार आहेत का,’ असा सवालही संजय निरुपम यांनी केला आहे.

दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून कायम आंदोलन करणारे आणि परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहे. मुंबई आयोजित उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून ही माहिती सांगितली आहे.

2 डिसेंबरला कांदिवलीत उत्तर भारतीय मंचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांनी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

Loading...

'मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे' असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.


VIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...