जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट; सोशल मीडियावरून व्हिडीओ केला शेअर

पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट; सोशल मीडियावरून व्हिडीओ केला शेअर

पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट; सोशल मीडियावरून व्हिडीओ केला शेअर

मिया खलिफानं (Mia Khalifa) नुकताच आर्मपीट (Armpit) म्हणजे काखेत बोटॉक्स ट्रीटमेंट (Botox Treatment) घेतल्याचं सांगितलं आहे. अर्थात ही ट्रीटमेंट घेण्याचं कारणही तिनं व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : सुंदर, आकर्षक आणि तरूण दिसण्यासाठी पॉर्न स्टार (Porn Star) देखील विविध प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. सौंदर्य, सुडौलपणा जपण्यासाठी ज्या पद्धतींचा वापर पॉर्नस्टार करतात, त्या पद्धती ते सोशल मीडियावरही (Social Media) शेअर करतात. मिया खलिफा (Mia Khalifa) हे त्यापैकीच एक नाव. मिया खलिफानं नुकतीच एक विशेष ट्रिटमेंट (Treatment) घेतली असून, या ट्रिटमेंटचा तपशील तिनं सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. मिया खलिफा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडिया अकाउंटवर ती सातत्यानं ग्लॅमरस फोटोज, टॉपलेस किंवा न्यूड फोटोज शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. याशिवाय ती चाहत्यांना फॅशन गोल्सही देते. तिचे बिकीनी सूटमधील फोटो देखील जोरदार व्हायरल होत असतात. तिनं जी विशेष ट्रिटमेंट घेतली आहे, त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सध्या होत आहे, याबाबतची माहिती ` आज तक `ने दिली आहे. अनुष्का शर्माआधी 6 अभिनेत्रींना Virat Kohli ने केले आहे डेट मिया खलिफा ही एक प्रसिद्ध पॉर्नस्टार आहे. मिया यापूर्वी पॉर्न इंडस्ट्रीत (Porn Industry) सक्रिय होती मात्र आता तिनं ही इंडस्ट्री सोडली आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील तिचे फोटो, व्हिडीओ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. माजी पॉर्नस्टार मिया खलिफा खरंतर स्पष्टवक्तेपणासाठीही विशेष प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना ती तिचं म्हणणं बेधडकपणे मांडत असते. याचं एक उदाहरण एका व्हिडीओतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मिया खलिफानं नुकताच आर्मपीट (Armpit) म्हणजे काखेत बोटॉक्स ट्रीटमेंट (Botox Treatment) घेतल्याचं सांगितलं आहे. अर्थात ही ट्रीटमेंट घेण्याचं कारणही तिनं व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे. ``मला काखेत खूप घाम येत असे. मी गेल्या 5 वर्षापासून हायपरहायड्रेसिस (Hyperhidrosis) या समस्येचा सामना करत आहे. एन्झायटी (Anxiety) वाढल्यानं परफ्यूम किंवा डिओडरेंट वापरूनही फारसा उपयोग होत नव्हता. प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी मी बोटॉक्स इंजेक्शन ट्रीटमेंट घेत आहे, असं मिया खलिफानं सांगितलं`. फटाके उडवताना अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल तुमचीही घाबरगुंडी ``या ट्रीटमेंटमुळे प्रमाणापेक्षा अधिक घाम येणं कमी झालं असून, मी आर्मपीटमध्ये वर्षातून 2 ते 3 वेळा ही ट्रीटमेंट घेत आहे``, असं मिया खलिफानं सांगितलं आहे. या इंजेक्शन ट्रीटमेंटची सर्व प्रक्रिया तिनं सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केली आहे. मिया खलिफानं जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ती म्हणते की `` मला शर्ट परिधान केल्यावर घाम येत नाही, त्यामुळे मी ग्रे शर्टही परिधान करू शकते. हिवाळ्यात घामाच्या डागांमुळं होणारा त्रास सहन करण्याची आता गरज नाही. आर्मपीटमध्ये बोटॉक्स ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझं आयुष्य बदललं आहे``.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात