मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /समीर वानखेडेंचं प्रकरण अजून मिटलं नाही, भुजबळांनी दिले नवे संकेत

समीर वानखेडेंचं प्रकरण अजून मिटलं नाही, भुजबळांनी दिले नवे संकेत

 'नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले आहे. त्यामुळे एनसीबीची पोलखोल झाली आहे

'नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले आहे. त्यामुळे एनसीबीची पोलखोल झाली आहे

'नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले आहे. त्यामुळे एनसीबीची पोलखोल झाली आहे

मुंबई, 04 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानची जामिनावर सुटका झाली आहे. पण दुसरीकडे अंमलीविरोधी पथक अर्थात एनसीबीचे मुंबईचे विभागाचे अधिकारी समीर वानखेडे वादात अडकले आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी गंभीर आरोप केले आहे. तर अजूनही समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याबद्दल सगळा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी नव्या अंकाचे संकेत दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत लक्ष्मीपूजन करून दिवाळी साजरी केली. यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना भुजबळ यांनी समीर वानखेडे प्रकरणावर भाष्य केलं.

'नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले आहे. त्यामुळे एनसीबीची पोलखोल झाली आहे. एक माणूस दोन धर्म आणि वडिलांची दोन दोन नावे हा सगळा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही, असं म्हणत भुजबळ यांनी नव्या वादाचे संकेत दिले आहे.

Aadhaar Card चा गैरवापर करणं पडेल भारी, होईल इतक्या कोटींचा होणार दंड

'लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही इकडे येतो. ही आमची 40 वर्षाची फॅक्टरी आहे. गणपती आणि दिवाळीला मी इथे येत असतो. आता दिवाळीनंतर काही जणांनी फटाके फोडण्याची धमकी दिली आहे. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरोखर बॉम्ब फोडत आहेत. राजकीय फटाके फोडायला दिवाळी लागत नाही. मला वाटतं आता सर्वांनी आराम करावा, असा सल्लाही भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

तसंच, अनिल देशमख यांच्यावर झालेले कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने आणि दुर्दैवी आहे. देशमुख यांच्याविरोधात ज्यांनी तक्रार दिली ते फरार आहे. अनिल देशमुख यांना असा त्रास का दिला जात आहे हे कळत नाही, असंही भुजबळ म्हणाले.

Photo : दिवाळी स्पेशल या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

'ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे त्याचा फायदा भाजपला किती होईल हे भाजपने पाहिले पाहिजे. आता ज्या पोट निवडणुका झाल्या त्याचा भाजपला काय फायदा होणार नाही, हे भाजपने लक्ष्यात ठेवावे, असा टोलाही भुजबळांनी भाजपला लगावला.

आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायचे आणि आता २-४ रुपये कमी करायचे. आज बेकारी, महागाई वाढत आहे. निवडणुकीच्या वेळी काही निर्णय घेतले जातात त्यातलाच हा निर्णय आहे, असंही भुजबळ म्हणाले.

First published: