Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Nawab Malik : "NCBच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र मिळालं, 'Special 26' ची माहिती प्रसिद्ध करणार" मलिकांच्या ट्विटने चर्चांना उधाण

Nawab Malik : "NCBच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र मिळालं, 'Special 26' ची माहिती प्रसिद्ध करणार" मलिकांच्या ट्विटने चर्चांना उधाण

Nawab malik tweet on NCB: एनसीबीच्या कारवाईबाबत मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विट्सची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा नवाब मलिक एक नवा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत.

Nawab malik tweet on NCB: एनसीबीच्या कारवाईबाबत मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विट्सची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा नवाब मलिक एक नवा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत.

Nawab malik tweet on NCB: एनसीबीच्या कारवाईबाबत मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विट्सची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा नवाब मलिक एक नवा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 26 ऑक्टोबर : एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारवाईप्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून ट्विट्सची मालिका सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारे मंत्री नवाब मलिक आता नवा गौप्यस्फोट करणार असल्याचं दिसत आहे. या संदर्भात मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट्स केले आहेत.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एकामागे एक दोन ट्विट्स केले आहेत. यापैकी एका ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक लिफाफा मिळाला आहे. या लिफाफ्यामधील मजकूर मी लवकरच ट्विटरवर प्रसिद्ध करणार आहे.

हे ट्विट केल्यानंतर पुढील काही मिनिटांत नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं, SPECIAL 26 मी लवकरच प्रसिद्ध करत आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या या दोन ट्विट्समुळे चर्चांना उधाण आले आहे. नवाब मलिक आता कोणता नवा गौप्यस्फोट करणार? स्पेशल 26 नेमकं काय आहे? कुणाच्या नावाचा यात समावेश आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

समीर वानखेडे दिल्लीत दाखल

मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे दिल्लीत पोहोचले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा तुरुंगात आहे. या प्रकरणी वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणी मुंबईत क्रूझवर एनसीबीने टाकेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही जणांना अटक करण्यात आली. आता छाप्यावर साक्षीदार असलेल्या मुंबईतील प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी समीर वानखेडेंची दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने समीर वानखेडेंची याचिका फेटाळली

दरम्यान, पंच प्रभाकर साईल याने काल एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पंच किरण गोसावीवर 25 कोटी खंडणीचा आरोप केला होता. या 25 कोटीची डील ही 18 कोटींवर फायनल झाली होती. यातील 8 कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा साईलने केला आहे.

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध करून जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज प्रभाकर साईल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही दावा केला आहे, तो ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्यावर वैयक्तिगत आणि कुटुंबावर नको ते आरोप होत आहे, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला होता. परंतु, एनसीबीची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. एनसीबीनं योग्य कोर्टात दाद मागावी, असं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. समीर वानखेडे आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का हे पाहावे लागणार आहे.

प्रभाकर साईलनं काय केलेत आरोप

प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात 18 कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.

प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Nawab malik, NCB