मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोर्टाची NCB ला चपराक, प्रभाकर साईलविरोधातील याचिका फेटाळली; समीर वानखेडेंना धक्का

कोर्टाची NCB ला चपराक, प्रभाकर साईलविरोधातील याचिका फेटाळली; समीर वानखेडेंना धक्का

प्रभाकर साईलने खंडणीचा आरोप केला होता, त्यानंतर ते ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल केली होती.

मुंबई, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणाला (aryan Khan arrest case)  आता मोठी घडामोड घडली आहे. पंच प्रभाकर साईलने (Prabhakar Sail ) व्हिडीओ प्रसिद्ध करून खंडणीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनसीबीने त्याचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून मुंबई सत्र न्यायलयात (mumbai court) धाव घेतली. पण, न्यायालयाने ही याचिका इथं दाखल करू नका, असं म्हणत समीर वानखेडे यांची याचिका धुडकावून लावली. त्यामुळे समीर वानखेडे (sammer wankhede) यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पंच प्रभाकर साईल याने काल एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पंच किरण गोसावीवर 25 कोटी खंडणीचा आरोप केला होता. या 25 कोटीची डील ही 18 कोटींवर फायनल झाली होती. यातील 8 कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा साईलने केला आहे.

अरे बापरे! कांद्यामुळे होतोय नवा साल्मोनेला आजार; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार 

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध करून जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज प्रभाकर साईल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही दावा केला आहे, तो ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्यावर वैयक्तिगत आणि कुटुंबावर नको ते आरोप होत आहे, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला होता.

परंतु, एनसीबीची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.  एनसीबीनं योग्य कोर्टात दाद मागावी, असं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. समीर वानखेडे आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का हे पाहावे लागणार आहे.

प्रभाकर साईलनं काय केलेत आरोप

प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात 18 कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.

Team India Coach : द्रविडच्या विश्वासू माणसाचा भारताचा कोच होण्यासाठी अर्ज

प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

First published: