• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 25 कोटी खंडणीप्रकरणी समीर वानखेडेंची जवळपास साडे चार तास चौकशी, NCB वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली महत्त्वाची माहिती

25 कोटी खंडणीप्रकरणी समीर वानखेडेंची जवळपास साडे चार तास चौकशी, NCB वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली महत्त्वाची माहिती

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बुधवारी चार तास चौकशी करण्यात आली.

  • Share this:
    मुंबई, 28 ऑक्टोबर: आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत एनसीबी (NCB) पथकाकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Narcotics Control Bureau) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बुधवारी चार तास चौकशी करण्यात आली. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह (Dnyaneshwar Singh) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. या चौकशीदरम्यान काही महत्त्वपूर्ण कागदपत्रही एनसीबीनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातला पंच प्रभाकर साईलनं किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यावर डील केल्याचा खळबळजनक आरोप करत गौप्यस्फोट केला. समीर वानखेडे यांनी काही साध्या कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा आरोपही प्रभाकर साईलनं केला. या संदर्भात बुधवारी समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र 25 कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी दोन दिवसात एनसीबीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. हेही वाचा-  Big News : आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; पुरावे मॅनिप्युलेट करण्याची ऑफर दिल्याचा हॅकरचा दावा
     वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईत आलं आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर बुधवारी पाच सदस्यीय टीम दिल्लीहून मुंबईत पोहोचली. या पथकानं वानखेडे यांची चौकशी केली. पथकानं एनसीबीच्या मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे आणि काही व्हिडिओ क्लिप ताब्यात घेतल्या.
    बुधवारी समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवण्यात आला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेण्यात येईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं. तसंच गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळं होतं. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जात आहे. त्यामुळे त्या दोघांनाही नोटीस पोहोचलेली नाही. त्यांनी येत्या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन त्यांनी आपली बाजू मांडावी, असं सिंह यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-  सांभाळून बोला, हमाम में सब नंगे है! जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरांना इशारा
     दरम्यान या प्रकरणी एनसीबी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह के. पी गोसावी, प्रभाकर साईल यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: