मुंबई, 27 ऑक्टोबर : आजही मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) ड्रग्स प्रकरणात तुरुंगात असलेल्या आर्यन खान (Aryan Khan Bail) याला जामीन दिला नाही. उद्या या प्रकरणात दुपारी २.३० नंतर सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (whatsapp Chat) ड्रग्सबाबत संभाषण झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आता या प्रकरणात जळगावातील (Jalgaon) एका हॅकरने मोठा दावा केला आहे. त्याच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. या हॅकरचं नाव मनीष भंगाळे असं असून तो जळगावातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली आहे. यात दिल्यानुसार पुराव्यांशी छेडछाड (manipulate the evidence) करण्यासाठी हॅकरला ५ लाखांची (hacker claims to have offered 5 Lacks) ऑफर देण्यात आली होती.
हे ही वाचा-मुंबई हायकोर्टाकडून आर्यन खानला आजही जामीन नाहीच; उद्या ठरणार निर्णय
काय लिहिलय तक्रारीत...
- हॅकर मनीष भंगाळे याची मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली
- आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटला एडिट करून देण्याची ऑफर दिल्याचा दावा
- प्रभाकर सैल याचं डमी सिम कार्ड तयार करण्यासही सांगितलं.
- अलोक जैन, शैलेश चौधरी यांनी 5 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा दावा
- काही मोबाईलचे CDR काढण्याचं दिलं काम
- शाहरुख खानची सेक्रेटरी पूजा ददलानीचाही मोबाईल नं, जैन आणि चौधरी यांनी दाखविल्याचा दावा
- मुंबईत काही अधिकारी आणि राजकिय नेते संपर्कात येतील असं भंगाळेला सांगितलं.
- आर्यन खानचे मोडीफिकेशन होऊ शकतात असा मनीष भंगाळेचा पोलीस आयुक्तांना इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drugs, NCB, Whatsapp chat