मुंबई, 27 ऑक्टोबर : कुणाविषयी काहीही बोलताना सांभाळून (Jitendra Awhad warns actress Kranti Redkar to mind her words) बोला, कारण हमाम में सब नंगे है, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांना दिला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या 22 नगरसेवकांनी 22 नगरसेवकांनी (22 corporators enter NCP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून जितेंद्र आव्हाड बोलत होते.
राष्ट्रवादी विरुद्ध एनसीबी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. समीर वानखेडे यांनी 4 हजार प्रवासी असलेल्या क्रूझवर धाड टाकली आणि त्यांना केवळ 6 जण ड्रग्ज घेतलेले मिळाले. बाकीचे 3 हजार 994 जण व्यवस्थित होते. हे कसं शक्य होईल, असा सवाल विचारत त्यांनी वानखेडेंवर टीका केली आहे. समीर वानखेडेंच्या सर्टिफिकेटबाबतदेखील त्यांनी टीका केली आहे. राज्यात 90 हजार जण बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागले होते. याचा अर्थ वानखेडेदेखील बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागल्याचं त्यांनी मान्य केल्याचा टोला आव्हाडांनी लगावला.
उल्हासनगरमध्ये वाढली राष्ट्रवादीची ताकद
उल्हासनगर महापालिकेत 40 पैकी 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेवर आता राष्ट्रवादीचीच सत्ता आल्यात जमा असल्याचं ते म्हणाले. हे सर्व नगरसेवक ओमी कलानी गटाचे आहेत. मात्र ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांच्यावर भाजप काय कारवाई करणार, अशी चर्चा होती. मात्र निम्म्याहून अधिक नगरसेवक जात असल्यामुळे काहीच कारवाई करता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.
हे वाचा- मुंबई हायकोर्टाकडून आर्यन खानला आजही जामीन नाहीच; उद्या ठरणार निर्णय
वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एनसीबी आणि तिथले अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे इतर नेतेदेखील मैदानात उतरत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drugs, Jitendra awhad, NCB, NCP