Home /News /mumbai /

राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य इतिहासाला धरुन नाही, त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे

राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य इतिहासाला धरुन नाही, त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे

औरंगाबाद येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत केलेल्या विधानावर संभाजीराजे यांची प्रतिक्रिया आली आहे.

    मुंबई, 3 मे : रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधी संदर्भात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या विधानावरुन विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. इतिहासकारांनीही राज ठाकरेंचा दावा खोडून काढला आहे. यावर आता संभाजीराजेंची प्रतिक्रिया आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबात केलेले वव्तव्य इतिहासाला धरुन नाहीये असं म्हणत खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं, कुणीही असेल... प्रामुख्याने जे जबाबदार व्यक्ती असतात. इतिहास जेव्हा आपण मांडतो तेव्हा इतिहासाला धरुन बोलायचं असंतं. जे काही वाक्य... समाधी ज्यांनी कुणी बांधलं असं बोललं गेलं ते साफ चुकीचं आहे. हे इतिहासाला धरुन नाहीये हे स्पष्टपणे मी सांगतो. त्यात खोल जाण्यापेक्षा त्यांनी त्याचा अभ्यास करावा. समाधी ज्या जबाबदार व्यक्तीने सांगितलं की, या व्यक्तीने बांधलं ते साफ चुकीचं आहे. त्यांनी असं का म्हटलं याबाबत मला भाष्य करायचं नाहीये. मला असं वाटतं की, इतिहास जेव्हा आपण मांडतो.. जर आपल्याला पूर्णपणे माहिती असेल तरच त्याच्यावर बोलावं नाहीतर त्याला हात सुद्धा लावू नये. मला इतकंच सांगायचं आहे की, ही समाधी टिळकांच्या हातून बांधली गेलेली नाहीये. मला जर इतिहास विचारला तर छत्रपतींचा वंशज म्हणून अधिकृतपणे, विचार करुन सांगू शकतो की ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाहीये असं विधान छत्रपती संभाजीराजे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. वाचा : राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाचं वॉरंट, अटक होणार? शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, राज ठाकरेंच्या या विधानावर संभाजीराज यांनी म्हटलं, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या व्यतिरिक्त इतरही मुद्दे आहेत असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. खासदारकीची टर्म संपल्यावर पुढे काय? ज्यावेळी मी खासदार झालो त्यावेळी माझी भूमिका स्पष्ट होती की शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार हा आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. याच्या पुढील माझी भूमिका सुद्धा हीच असणार आहे. खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे. 3 तारखेनंतर म्हणजेच माझा कार्यकाळ संपल्यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मी म्हटलं होतं. लवकरच मी माझी भूमिका मांडेल. डोक्यात सर्व विचार नक्की आहेत असंही संभाजीराजे म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chhatrapati shivaji maharaj, Maharashtra News, Raj Thackeray

    पुढील बातम्या