सलमान खानच्या बंगल्यात राहत होता अट्ट्ल गुन्हेगार, पोलिसांनी बांधल्या मुसक्या

सलमान खानच्या बंगल्यात राहत होता अट्ट्ल गुन्हेगार, पोलिसांनी बांधल्या मुसक्या

29 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातला हा आरोपी आपली खरी ओळख लपवून सलमान खानच्या बंगल्यात 15 वर्षांपासून काम करत होता.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार मुंबई 09 ऑक्टोंबर : मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या बंगल्यातून एका अट्ट्ल गुन्हेगाराला आज अटक केली. सलमानच्या गारोई इथल्या बंगल्यात हा आरोपी केअर टेकर म्हणून राहत होता. शक्ती सिद्धेश्वर राणा असं त्याचं नाव आहे. राणा हा गेल्या 15 वर्षांपासून या बंगल्यात नोकर म्हणून राहात होता. त्याच्यावर चोरी आणि मारहाणीचा आरोप होता. शक्ती हा 29 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेतला आरोपी आहे. फिल्मी स्टाईल तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली. चित्रपटात शोभावी अशी ही घटना आहे. मुंबईतल्या वरळी इथं 1990मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी अटक केली होती. एका घरात घुसून मारहाण करणं आणि सामान लुटून नेणं असा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन मिळाला. तेव्हापासून तो कधीच सुनावणीसाठी हजर राहिला नाही.

PM मोदींच्या दौऱ्यांसाठी Air Forceचं नवं विमान, क्षेपणास्त्र हल्लाही परतवणार

पोलीस या प्रकरणाचा शोध घेत राहिले मात्र शक्ती हा फरार झाला तो सापडलाच नाही. काही खबऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी 29 वर्षांचं हे जुनं प्रकरण पुन्हा बाहेर काढलं आणि शोधमोहिम राबवली. गोराईत त्याचा शोध घेत असताना तो एक बंगल्यात आढळला.

पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं, PMPबसवर झाड कोसळून चालक जखमी

चौकशी केली असता हा बंगला सलमान खानचा असल्याची माहिती पोलिसांना कळाली. तो इथे आपली खरी ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. आता पोलीस आणखी चौकशी करत असून शक्ती इतर कुठल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का, त्याचे इतर साथीदार आहेत का याचा शोध घेत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2019, 11:53 PM IST

ताज्या बातम्या