नवी दिल्ली 09 ऑक्टोंबर : अमेरिकेचे (America) राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांच्या दौऱ्यांसाठी बोइंगचं 747-200B हे विमान वापरलं जातं. त्यानंतर आता भारताचे (India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासाठीही बोइंगचं 777-300ER हे विमान घेण्यात येणार आहे. या विमानाचा ताबा हा आता Air India कडे न राहता Air Forceकडे असणार आहे. अतिशय अत्याधुनिक असलेलं हे खास विमान (Special Aircraft) जून 2020 पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्रांचा (Missile) या विमानावर परिणाम होणार नाही. अशी दोन विमानं हवाई दलात दाखल होणार आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश दौऱ्यांसाठी सध्या Air Indiaचं B-747 हे विमान वापरलं जातं. या विमानात पंतप्रधानांचं छोटं कार्यालयच स्थापन करण्याची व्यवस्था आहे. Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं 21 हजार कोटींचं सामान अतिमहत्त्वांच्या व्यक्तिच्या प्रवासासाठी हे विमान खास राखीव ठेवलेलं असतं. मात्र नव्या काळाची गरज आणि अधिक सुरक्षीत असलेल्या विमानाची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे नवं विमान आल्यावर पंतप्रधानांच्या विमानाची सुरक्षा ही अमेरिकेच्या अध्यक्षांच्या तोडीची होणार आहे. Ambulance उशिरा पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांच्याच भावाचा झाला मृत्यू या विमानात सर्व व्यवस्था अत्याधुनिक असून कुठल्याही राष्ट्रप्रमुखासाठी त्या गरजेच्या असल्याचा दावा करण्यात येतोय. कुठलेही क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावण्याची खास यंत्रणा या विमानात लावण्यात आली आहे. त्याचबरोबर या विमानाची इंधन क्षमताही जास्त असून इंधन भरल्यानंतर हे विमान दिल्लीतून थेट अमेरिकेला जावू शकणार आहे. कार्यकर्त्याचा मान राखण्यासाठी ‘सारथी’ बनले राज ठाकरे! या नव्या विमानात Anti Missile System लावण्यात येणार आहे. ही सिस्टिम अमेरिकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी 19 कोटी डॉलर मोजण्याची तयारी भारताने दाखवली आहे. क्षेपणास्त्र विमानाजवळ येण्याआधीच त्याला जाम करण्याची शक्ती या सिस्टिमकडे असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.