मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली

BREAKING : सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती.

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती.

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती.

मुंबई, 12 मार्च : मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. दरम्यान विधानसभेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानंतर आज सचिन वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. (Sachin Waze transfer twice in the same day)

मात्र पुन्हा नव्या माहितीनुसार तेथूनही सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याचा अर्थ एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. SB 1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी त्यांना पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रात सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहे, या चर्चेला उधाण आलं आहे. 

हे ही वाचा-'सचिन वाझेंसाठी वकिलाची गरज नाही, त्यासाठी उद्धव ठाकरे आहेत'

मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. (Sachin Waze transfer twice in the same day) यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता. सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली जात होती. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपासानंतर निर्णय घेतला जाईल, असं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितले होते.

 

First published:

Tags: BJP, Mumbai, Sachin waze, Shivsena, Udhhav Thakeray