मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'सचिन वाझेंसाठी वकिलाची गरज नाही, त्यासाठी उद्धव ठाकरे आहेत' फडणवीसांनी घेतला समाचार

'सचिन वाझेंसाठी वकिलाची गरज नाही, त्यासाठी उद्धव ठाकरे आहेत' फडणवीसांनी घेतला समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 मार्च : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी करीत आहे. मात्र ठाकरे सरकावर यावर निर्णय घेत नसल्याचं दिसत आहे. सचिन वाझेंकरिता वकिलाची गरज नाही, त्यासाठी मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. (Sachin Waze doesnt need a lawyer Uddhav Thackeray is for that devendra Fadnavis attack )

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने वीज कनेक्शन कापणार यावर स्थगिती देण्यात आली होती, मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवणं ही मोठी लबाडी असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी लगावला. आज ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना वीजेचा शॉक दिला आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करू असं म्हटलं होतं, मात्र शेतकऱ्याला एक नवा पैसा देण्यात आला नाही. राज्यात शेतक-यांची पूर्ण फसवणूक सरकारने केली आहे. पीक विम्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली. (Sachin Waze doesnt need a lawyer Uddhav Thackeray is for that devendra Fadnavis attack )

हे ही वाचा-'सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? टार्गेट करण्याची प्रवृत्ती सोडा'

पीक विमान्याचे निकष ठरवणे व त्याचे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येक राज्य आपआपल्या राज्याचं टेंडर काढतं, मात्र राज्य सरकारने टेंडर बदलले. परिणामी फायदा विमा कंपन्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला नाही. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतात, आणि स्वत: मूक गिळून बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकार हे लबाड सरकार असून इतिहासात ठाकरे सरकारचं नाव लबाड सरकार म्हणून नोंदवलं जाईल, असं म्हणत हल्लाबोल केला.

First published:

Tags: Udhav thackarey