तुषार कोहळे/नागपूर, 12 मार्च : नागपुरात मध्यप्रदेशच्या सागर भागातून एक तरुण दाम्पत्य मजुरीसाठी आले होते. त्यांना हुडकेश्वर भागातील टाईल्स कंपनीत पोहचायचे होते, त्यासाठी त्यांनी एक रिक्षा बुक केली होती. त्या रिक्षातून त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रवास सुरू केला. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोनशे रुपये भाडे द्यायचे ठरले. डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन सुरू झालेला हा प्रवास थेट पोलीस कोठडीत जाऊन संपला. (The family had come to Nagpur to work ) गुरुवारी सागर येथून आलेले रजत दाम्पत्य नागपूरच्या खरबी भागात उतरले. तेथून त्यांनी अनिल बर्वे यांचा रिक्षा बुक केली. नंतर आरोपी अनंतराम रजत हा आपल्या पत्नीसह खरबी येथून रिक्षाने हुडकेश्वर आऊटर रिंगरोड येथील टाईल्स कंपनीजवळ पोहचले. मात्र रिक्षातून उतरल्यानंतर दोनशे रुपये द्यायला अनंतराम यांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यातला वाद विकोपाला गेला. अनंतरामने रस्त्याच्या शेजारी पडून असलेला दगड रिक्षाचालक अनिल बर्वे यांच्या डोक्यात घातला व पुढे निघून गेले. पुढे पायी जात एका पेट्रोल पंपावर रात्रभर थांबले. त्यावेळी अनिल बर्वे यांचा मृत्यू झाला हे आरोपी दाम्पत्यांना माहीत देखील नव्हते. वाटसरुंना रस्त्यावर पडलेला मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. हे ही वाचा- नोकरीसाठी पैसे आणि शरीरसुखारी मागणी, जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार ही घटना नागपूरचा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतकाची ओळख पटली असून तो शिक्षाचालक असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांना विचारपूस करण्यात आली. अनिल बर्वे हे एका दाम्पत्याची सवारी घेऊन हुडकेश्वर आऊटर रिंगरोड भागात गेल्याचे पुढे आले. त्या नंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. घटनास्थळाजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर हे दाम्पत्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रिक्षाचे भाडे दोनशे रुपये झाले होते व इतके पैसे अनंतराम रजत याच्या जवळ नव्हते. त्यातून मृतक व आरोपी यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने मृतकच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.