मुंबई, 30 मार्च : मुंबईमधील (Mumbai) कारमायकल रोडवर स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) कसून चौकशी करत आहे. या प्रकरणी आता दररोज नवनवीन खुलासे होत आहे. सचिन वाझे यांचा आणखी कारनामा समोर आला आहे.
सचिन वाझे यांचे कारनामे काही संपण्याचे नाव घेत नाहीये आता आणखी एक महागडी अशी mitsubishi outlander ही कार समोर आली आहे. सचिन वाजे यांच्या नावावर ही गाडी आहे. नवी मुंबईत कामोठ्यात एका रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडली आहे. या गाडीचा नंबर MH 01 AX 2627 असा आहे आणि जर या गाडी बाबत ऑनलाईन माहिती काढली असता ही गाडी सचिन वाजे यांच्या नावावर असून 23 जून 2011 या तारखेला सचिन वाझे यांनी गाडी विकत घेतली आहे. ही गाडी तेच वापरत होते असं देखील तपासात समोर आले आहे. सचिन वाझे राहण्यास ठाण्यात आहे मग ती गाडी नवी मुंबईत बेवारस पद्धतीने का पडली होती, असा प्रश्न तपास यंत्रणेपुढे पडला आहे.
माधुरी दीक्षितच्या 'Dance Deewane 3' सेटवर कोरोनाचा अटॅक; 18 जण पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांचीही गाडी सीआययू या टीम पैकी एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी वापरत होता. पण या गाडीचा वापर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडीच्या कटात तसंच मनसुख यांच्या हत्येच्या कटात वापर केला गेला का याचा तपास आता एनआयए करीत आहे.
तर दुसरीकडे सचिन वाझे आणि विनायक शिंदे या दोघांना मोबाईलचे बोगस सिमकार्ड पुरवणारे आणखीन दोन जणांना ठाणे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. गुजरात राज्याच्या अहमदाबाद येथून या दोघांना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून या दोघांनी बोगस सिमकार्ड नरेश गोर यांच्यामार्फत सचिन वाझे आणि विनायक शिंदे या दोघांना पुरवली असल्याचा संशय महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आला होता. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. पण दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्यात आला. या दोन्ही आरोपींना एनआयएला सुपूर्द केले आहे.
परमबीर सिंग आरोप प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या चौकशी समितीची अखेर घोषणा
तसंच ज्या व्होल्वो या महागड्या गाडीतून मनसुखलाल बेशुद्धावस्थेत ठाणे गायमुख चौपाटी ते रेतीबंदर मुंब्रा यादरम्यान नेण्यात आलं होतं. त्या महागड्या व्होल्वो गाडीचा ताबा घेण्याकरता एनआयएची टीम ठाण्यात दाखल झाली होती. लवकरच या गाडीची फोरेन्सिक तपासणी करणार आहे. त्यामुळे सचिन वाझे आणि त्याच्या टीमच्या विरोधात एक एक पुरावा गोळा करण्याचे काम एनआयए करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin vaze