जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरी दीक्षितच्या 'Dance Deewane 3' सेटवर कोरोनाचा अटॅक; 18 जण पॉझिटिव्ह

माधुरी दीक्षितच्या 'Dance Deewane 3' सेटवर कोरोनाचा अटॅक; 18 जण पॉझिटिव्ह

माधुरी दीक्षितच्या 'Dance Deewane 3' सेटवर कोरोनाचा अटॅक; 18 जण पॉझिटिव्ह

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) डान्स दीवाने 3 च्या (Dance Deewane 3) सेटवर कोरोनाने थैमान घातलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : कोरोना महासाथीच्या (Covid 19) दुसऱ्या लाटेचा बॉलिवूडलाही मोठा तडाखा बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus in bollywood) झाले आहेत. दरम्यान आता अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) डान्स दीवाने 3 च्या (Dance Deewane 3) सेटवरसुद्धा कोरोना घुसला आहे. डान्स दीवानेच्या सेटवरील तब्बल 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. डान्स दीवाने 3 हा डान्स रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षित मुख्य जज आहे. याशिवाय धर्मेश येलांड आणि तुषार कालियासुद्धा यामध्ये जज म्हणून आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार  शोच्या सेटवर 18  लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे या कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक जण घाबरला आहे. डान्स दीवानेचा सेट गोरेगावमध्ये आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

FWICE  चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी सांगितलं, या शोमध्ये कास्ट आणि क्रूची आधी टेस्ट करून घेतली जाते आणि त्यामुळे नव्या क्रूसाठी काही वेळ आहे.  या शोचं पुढील शूटिंग 5 एप्रिलला होणार आहे आणि पुन्हा एकदा प्री-टेस्ट केलं जाईल. ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांनाच सेटवर येण्याची परवानगी दिली जाईल. शिवाय आवश्यक ती खबरदारीही घेतली जाईल. हे वाचा -  Drug case : शादाब बटाटाच्या अटकेनंतर NCB ची मोठी कारवाई; बॉलिवूड अभिनेता ताब्यात जे काही झालं ते खूप दुर्दैवी आहे. कोरोना संक्रमित लोकांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना आम्ही करतो, असंही ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात