Home /News /mumbai /

अमृता फडणवीसांशी पंगा घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांना लवकरच मिळणार मोठी जबाबदारी

अमृता फडणवीसांशी पंगा घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांना लवकरच मिळणार मोठी जबाबदारी

राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (Chairman of the State Women's Commission) निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पाळला होता. त्यावेळी या निर्णयावर  'आज वसुली सुरु आहे की बंद? 'असा खोचक सवाल करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर चाकणकर यांनी ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे ट्वीट केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं, त्यामुळं आता चाकणकर यांची महिला अध्यक्ष पदी वर्णी लागणार आहे. तसंच अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते. हे वाचा - “आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय” म्हणणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचा चिमटा, म्हणाले… गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर ( Rupali Chakankar ) यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra politics, NCP

    पुढील बातम्या