मुंबई, 15 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पण अशाही परिस्थितीत आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या झोपडपट्टी धारावीने कोरोनाला हद्दपार केले आहे. एकीकडे धारावी कोरोनामुक्त झाली आहे तर दुसरीकडे राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी धारावीत मुख्य काम हे मुंबई पालिकेनंच केले आहे, असं म्हणून चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. ‘धारावी ही कोरोनामुक्त झाली ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं. पण, मुंबई पालिकेनं उत्तम काम केल्यामुळे धारावीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली. धारावीत मुख्य काम हे मुंबई पालिकेनं केले आहे’ असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, धारावीत इतर स्वयंसेवी संस्थांनीही मदत केली, असंही ते सांगायला विसरले नाही. पुणे पालिकेतच जमादाराची दारू पार्टी, रोखण्यास गेले तर केली मारहाण, पाहा हा VIDEO तसंच, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कधी श्रेयासाठी काम करत नाही. हे काम ट्रोल्स करत असतात. त्यांनी आधी ठरवायचं आहे की धारावी मॉडेलला अपयशी ठरवायचं की त्याच्या यशाचं श्रेय घ्यायचे’, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी, धारावी कोरोनामुक्त झाल्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संघाच्या स्वयंसेवकामुळे धारावी कोरोनामुक्त झाली असा दावा केला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीत संघाने काम केल्याचा दावा केला होता. कोरोनाला हरवून देश कसा जिंकणार? वाचा 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मुंबईतील धारावी कोरोनामुक्त झाली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहे, त्याचे कौतुक झाले पाहिजे. पण, धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घराघरात जाऊन स्क्रिनिंग केलं. कुणाला ताप आहे, कुणाला श्वसनाचा त्रास आहे, याची तपासणी केली. मुंबई पालिकेनंही काम केले असं नाही. पण सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही’. एवढंच नाहीतर दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी ट्वीट करून संघाने मुंबईत किती काम केले, अन्नदान किती वाटप केले, कुठे मदत केली, याचा लेखाजोखाच वाचून दाखवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.