मुंबई, 31 मे : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून (fuel rate hike) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवार इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका करत आहे. त्यावर चंद्रकांत पाटलांनी दिलेला सल्ला आणि त्यावर रोहित पवारांचं उत्तर यामुळं या दोन नेत्यांमध्ये या मुद्द्यावर जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. (Rohit Pawar vs Chandrakant Patil) (वाचा- संभाजीराजे म्हणाले, मी आधी समाजाचा योद्धा, त्यांचे प्रश्न सुटले तरच… ) रोहित पवार यांच्यासह अनेक नेते आणि इतर स्तरांतून सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून टीका होत आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारनं की करण्याची मागणी केली जात आहे. या टीकेवर केंद्राच्या बाजुनं प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडं बोट दाखवलं होतं. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. पण जर राज्य सरकारला एवढं वाटत असेल तर त्यांनी पेट्रोलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा असं म्हटलं होतं.
राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर आहे. pic.twitter.com/0ThZx3AmtL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 31, 2021
चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला दिलेल्या सल्ल्यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली. 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. अशी टीका रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि त्याचवेळी केंद्रावरही केली. (वाचा- राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, पवारांच्या भेटीला फडणवीस ‘सिल्वर ओक’वर! ) दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं शेजारच्या राज्यांमध्ये असलेले इंधनाचे दर पाहावे. त्यानुसार आपले दर कमी करावे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही रोहित पवारांनी तौक्तेच्या मदतीचा संदर्भ देत टोला लगावला होता. शेजारच्या राज्यांना शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटींची मदत मिळते. तशी मदतही महाराष्ट्राला मिळत नाही, त्यामुळं हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळं इंधन दरवाढ आणि त्यावर भाजप नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या समर्थनावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारनं सर्व सामान्यांचा विचार करवा. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास सामान्यांना जणं मुश्लिक होईल, असं ते म्हणाले आहेत.