मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /टोलनाक्याजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात, मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी

टोलनाक्याजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात, मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातादरम्यान टँकरने पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली .

अहमदाबाद, 06 जानेवारी : मुंबई अहमदाबाद मार्गावर खानिवडे टोलनाक्याजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आणि या अपघातामध्ये टँकर उलटला. अपघातानंतर एका वाहनांला भीषण आग लागली आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

या अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि पोलीस विभागाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीनं महामार्गावरील गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. तर दुसरीकडे या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-मोदी सरकार अहंकाराने पेटले, शिवसेनेची जळजळीत टीका

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातादरम्यान टँकरने पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली . या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गुजरातहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.

First published:

Tags: Gujrat, Mumbai News