मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : 'राजीनामा देतो, पण चौकशीनंतर निर्णय घ्या', संजय राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती

BREAKING : 'राजीनामा देतो, पण चौकशीनंतर निर्णय घ्या', संजय राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपुर्द केला आहे. पण चौकशी झाल्यावर राजीनामा स्वीकारावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पूजा चव्हाण तरुणी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. 'मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजुर करा.' अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पोहरादेवी महंताचा विरोध

वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे विनंती केली आहे. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली आहे.

तसंच, जर वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असंही जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

...तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सगळे सदस्य राजीनामे देतील - फडणवीस

'कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही बोलायलाच नको राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. आता याबद्दल बोलायची काय सोय राहिली आहे, मंत्री आणि सत्ताधारी नेते यावर आघाडीवर आहेत. संजय राठोडांच्या संदर्भातले सगळे पुरावे असताना साधा एफआयआर देखील दाखल नाही. पोलिसांची इतकी लाचार अवस्था आहे आधी कधीच पाहिली नाही. पुण्यातील पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करावं त्यांना नोकरीत राहायचा कोणताही अधिकार नाही, असं फडणवीस म्हणाले.

'यापेक्षा अधिक पुरावे कोणत्याही केसमध्ये नाही. राज्यांत या सरकारचा चेहरा उघड झाला आहे.  राष्ट्रवादीचे युवा नेते असतील, ज्यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यावरही कारवाई नाही. धनंजय मुंडेंबाबतचा प्रश्न संपलेला नाही. सत्तेतल्या लोकांना लैंगिक स्वैराचाराची भूमिका या नव्या कायद्यात आहे का? जर संजय राठोड यांचा राजीनामा देण्यात आला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सगळे सदस्य राजीनामे देतील,' असा इशारा फडणवीस यांनी दिला.

First published:

Tags: Beed, Mumbai, Pooja Chavan, Sanjay rathod, Uddhav thackeray