मुंबई, 08 एप्रिल : सचिन वाझे प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सचिन वाझेचं निलंबन कुणाच्या सांगण्यावरून मागं घेण्यात आलं होतं, याच्याही चर्चा सुरु आहे. पोलीस दलातील पुनर्नियुक्तीवरुन हा राजकीय वाद रंगला होता. आता या पुनर्नियुक्तीविषयीची माहिती समोर आली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या समितीनं वाझेचं निलंबन मागे घेत पुनर्नियुक्ती केल्याचं उघड झालं आहे. (Mumbai Commissioners report on Sachin Vaze case)
सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेचा मुंबई पोलीस दलात एकेकाळी मोठा दबादबा असल्याचं समोर आलं आहे. वाझे प्रकरण गंभीर बनल्यामुळं मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गृहमंत्र्यांना एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे जवळचे संबंध (Sachin Vaze and Parambir Singh relationship) होते. या अहवालानुसार सचिन वाझे हा मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना थेट रिपोर्ट करत होता. परमवीर सिंग यांनी सचिन वाझेला विशेष अधिकार दिल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
वाचा - सचिन वाझे आणि साथीदारांसंदर्भात महत्त्वाचा पुरावा NIA च्या हाती; अटकेचं सत्र सुरू होणार?
या अहवालानुसार सचिन वाझे याची सीआययूच्या प्रमुखपदी नियुक्ती करायला गुन्हे शाखेच्या तत्कालीन सहपोलीस आयुक्तांनी विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून वाझेची सीआययूच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यामुळं मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांचा वाझेच्या डोक्यावर हात होता, असं अहवालातून समोर यंत आहे.
वाझे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना थेट रिपोर्ट करत होता. तसंच त्याचं निलंबन मागं घेऊन त्याची पुनर्नियुक्ती केल्याबाबतही नवी माहिती समोर आली आहे. जून 2020 मध्ये निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविषयीचा आढावा घेण्यात आला. आढावा समितीत तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस सहआयुक्त(प्रशासन), मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा) यांचा समावेश होता. या समितीनं एकूण 113 प्रकरणांचा आढावा घेतला. त्यापैकी 18 जणांचं निलंबन मागं घेण्यात आलं. या 18 जणांमध्ये सचिन वाझेच्या नावाचा समावेश होता. विशेष म्हणजे यावेळी परमबीर सिंग हेच मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि निलंबन आढावा समितीतही ते होते. विशेष म्हणजे वाझेच्या पुन्हा नियुक्तीनंतर तो वरिष्ठांना अपमानकारक वागणूक देत होता, अशाही चर्चा आहेत.
वाचा - अनिल देशमुखांना SCचा झटका आणि जावडेकरांनी केलेल्या राजीनाम्यावर राऊतांची म्हणाले
मुंबईत अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेलं वाहन ठेवल्याप्रकरणी एनआयएनं सचिन वाझेला अटक केली आहे. अटकेनंतर त्याचे एकएक कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्यात आता वाझेवर परमबिर सिंग याचा वरदहस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता तपास आणखी या दिशेलाही वळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Sachin vaze