मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सचिन वाझे आणि साथीदारांसंदर्भात महत्त्वाचा पुरावा NIA च्या हाती; अटकेचं सत्र सुरू होणार?

सचिन वाझे आणि साथीदारांसंदर्भात महत्त्वाचा पुरावा NIA च्या हाती; अटकेचं सत्र सुरू होणार?

कार माइकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यासंदर्भात तसंच मनसुखच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

कार माइकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यासंदर्भात तसंच मनसुखच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

कार माइकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यासंदर्भात तसंच मनसुखच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

मुंबई, 8 एप्रिल : मुंबईतील कार माइकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यासंदर्भात तसंच मनसुखच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सचिन वाझे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेले कारनामे आता तपासामधून उघड होत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे आणि त्याच्या साथीदारांच्या संदर्भात एक महत्त्वाचा पुरावा एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यावरूनच एनआयए आता अटकेचे सत्र सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार माइकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी पार्क करण्याआधी सचिन वाझे आणि त्याच्या टीमची एक बैठक झाली होती. ही बैठक मीरा रोड वसई या दरम्यान असलेल्या एका फार्महाऊसवर झाली होती. या बैठकीत गटाचा मुख्य भाग शिजल्याचा संशय एनआयएकडून व्यक्त केला जात आहे. तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला ते उपस्थित राहिले होते. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे आणि विनायक शिंदे यासोबतच काही संशयित आरोपी एकत्र दिसून आले आहेत आणि बैठक कोणी आयोजित केली होती याबाबत एनआयए आता चौकशी करत असून या बैठकीबाबत एनआयएने विनायक शिंदे नरेश आणि सचिन वाझे यांची चौकशी देखील केली आहे.

हे ही वाचा-अनिल देशमुखांना SCचा झटका आणि जावडेकरांनी केलेल्या राजीनाम्यावर राऊतांची म्हणाले

आता हा फार्महाऊस कोणाचा होता आणि फार्महाउस वरच बैठक घेण्याचे काय कारण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता एनआयएनने तपास सुरू केलेला आहे. एवढेच नाही तर कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी पार्क करण्याआधी काय काय गोष्टी आणाव्या लागतील, विकत घ्याव्या लागतील तसचं गाड्या कोणत्या वापरायच्या आणि त्या कशा आणायच्या याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एनआयएकडे आहे. त्यामुळे कार मायकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाचा तसेच मनसुखच्या हत्याप्रकरणाचा संबंध जसा मुंबई आणि ठाण्याशी जोडलेला आहे तसाच आता या सर्व प्रकरणाचा संबंध मीरारोड-वसईशी देखील जोडला जात आहे. त्यामुळे आता एनआयए या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोणाला अटक करते किंवा कोणावर कारवाई करते हे पाहावे लागेल.

First published:
top videos