मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रिलायन्स फाउंडेशनची कोविड काळात सर्वाधिक मदत; मुंबईत 875 बेड्सची सुविधा

रिलायन्स फाउंडेशनची कोविड काळात सर्वाधिक मदत; मुंबईत 875 बेड्सची सुविधा

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) वतीने वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबवर (NSCI Worli Mumbai) केलेली 650 बेड्सच्या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन करण्यात येईल.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) वतीने वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबवर (NSCI Worli Mumbai) केलेली 650 बेड्सच्या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन करण्यात येईल.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) वतीने वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबवर (NSCI Worli Mumbai) केलेली 650 बेड्सच्या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन करण्यात येईल.

मुंबई, 26 एप्रिल: वाढत्या कोरोना संकटाचा तडाखा लक्षात घेत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने मुंबईत कोरोना रुग्णांसाठीची सुविधा (Covid care centre Reliance) 827 बेड्स पर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कुठल्याही संस्थेने केलेल्या मदतीत अग्रणी राहिलेल्या रिलायन्स फाउंडेशनने कोविड केअरसाठी मुंबईत सर्वात मोठ्या प्रमाणावर सेवा देऊ केल्या आहेत.

HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) वतीने वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबवर (NSCI Worli Mumbai) केलेली 650 बेड्सच्या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन करण्यात येईल. याशिवाय रिलायन्स फाउंडेशनने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC Trident hotel) इथल्या ट्रायडण्ट हॉटेल इथे लक्षणं नसलेल्या रुणांसाठी 100 बेड्सची आयसोलेशन सुविधा पुरवण्यात आली आहे. 100 ICU बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वरळीच्या नॅशनल स्पोर्ट् स क्लब ऑफ इंडियामध्ये (NSCI)कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येईल. याशिवाय RF अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करणा आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील.

'कोरोना संकटकाळात मोदींच्या एका हाकेला धावून आले सगळे भारतीय उद्योजक' - CAIT

500 हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना RF च्या वतीने या सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे.

ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास 225 बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 100 बेड्स आणि 20 ICU बेड्सची जबाबदारी फक्त RF ने उचलली होती.

आत्तादेखील सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि NSCI इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

भारताला Google कडून मोठी मदत;सुंदर पिचाईंनी केली 135 कोटींच्या रिलीफ फंडची घोषणा

सर्व मिळून RFH च्या वतीने शहरातले 875 बेड्स यामध्ये 145 ICU बेड्सची व्यवस्था होणार आहे. देशातल्या कुठल्याही स्वयंसेवी संस्थेने कोविड केअरसाठी दिलेल्या मदतीपेक्षा ही मुंबईतली सुविधा सर्वात मोठी आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या, "कोविड साथीविरुद्ध लढण्यासाठी  रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचवण्याचं काम असंच करत राहू. मुंबईतल्या 875 कोविड बेड्सची व्यवस्था आम्ही पाहात आहोत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्ये प्रदेश आणि दमण दीव, नगर हवेली इथे दररोज 700 MT इतका ऑक्सिजनचा पुरवठा फाउंडेशनच्या वतीने मोफत देण्यात येत आहेत. या संकटकाळात देशवासीय म्हणून जेवढं शक्य आहे ते आम्ही करत आहोत. कोरोना हारेहा इंडिया जितेगा."

Disclaimer: News18lokmat हे माध्यम  Network18 आणि TV18 या कंपन्यांच्या संचालनात आहे. या कंपन्या   Independent Media Trust नियंत्रित करतात ज्याचा रिलायन्स इंडस्ट्रीज लाभार्थी आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai, Reliance