मुंबई, 07 डिसेंबर : बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp minister jitendra awhad) यांच्या मुलीचा विवाहसोहळा (jitendra awhad daughter wedding) आज पार पडला आहे. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. राजकीय नेत्यांच्या मुलांची लग्न म्हटलं की, महागड्या लग्न पत्रिका, फाईव्ह स्टार हॉटेल, मंत्र्यांपासून ते उद्योजकांची एकच लग्नाला गर्दी असते. पण जितेंद्र आव्हाड यांनी शाही लग्न पद्धतीला फाटा देऊन आपल्या मुलीचे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे.
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले .....#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAA
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा (natasha awhad ) विवाह व्यावसायिक एलन पटेल याच्याशी रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. नव्या वर्षांत पुन्हा 6 नवीन मालिका! 2021 Year End लाच होणार धमाकेदार एंट्री एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना जितेंद्र आव्हाड भावुक झाल्याचे पाहण्यास मिळालं. “कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार आहे, घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

)







