मुंबई, 09 ऑगस्ट: येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी काल केली. कोरोना लशीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र आता या रेल्वेच्या पासबाबत प्रवाशांना प्रश्न पडला आहे. पास कसा मिळवायचा?, तो कुठे डाऊनलोड करता येईल, असं काहीसे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. या सर्व नागरिकांसाठी एक अॅप तयार केला आहे, या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी त्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकणार आहेत. त्या अॅपबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच ज्या प्रवाशांकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकणार आहेत. औरंगाबादनंतर ‘या’ जिल्ह्यातही Delta+ Variant चा शिरकाव तरच करता येणार लोकलने प्रवास; जाणून घ्या नियम लशीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच लोकलने प्रवास करता येणार यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेचा पास डाऊनलोड करावा लागेल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







