जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीडमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, आढळला एक रुग्ण; राज्यात Delta च्या रुग्णात वाढ

बीडमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, आढळला एक रुग्ण; राज्यात Delta च्या रुग्णात वाढ

बीडमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, आढळला एक रुग्ण; राज्यात Delta च्या रुग्णात वाढ

कोरोनाच्या (Corona Virus) डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) चे 45 रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळून आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 09 ऑगस्ट: कोरोनाच्या (Corona Virus) डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) चे 45 रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळून आले आहेत. तपासणीतून राज्यात 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. त्यातच आता बीड (Beed) जिल्ह्यातही डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबाद पाठोपाठ आता बीडमध्येही रुग्ण सापडल्यानं प्रशासन अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या चार तालुक्यात कडक निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 200 हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे हा आकडा चिंताजनक आहे. डेल्टा व्हेरिएंटचा जो रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरु आहे. जनुकीय कर्मनिर्धारण सर्वेक्षणातून रुग्ण शोधला असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ‘ती’  मान्य मागणी, मनसेकडून खास Tweet Delta Variant ची मुंबई-ठाण्यात धडक नाशिकपाठोपाठ मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta Variant) रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( rajesh tope) यांनी दिली. एकूण रुग्ण संख्या ही 45 वर पोहोचली आहे. राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबई ठाणे रत्नागिरी, औरंगाबाद येथे रुग्ण वाढ दिसते. डेल्टा प्लस रुग्ण वाढ झाली तरी घाबरण्याचे कारण नाही, पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही टोपे म्हणाले. मात्र, रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन देखील टोपेंनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात